रामकृष्ण मारोती बिरादार यांचा वाडीकर ज्वेलर्स तर्फे सन्मान सत्कार.
उदगीर (एल पी उगिले) येथील
वाडीकर ज्वेलर्स यांच्या वतीने नेहमीनवनवीन उपक्रम राबवुन सामाजीक बांधीलकी जपली जाते. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय स्तरावरील आरोग्य क्षेत्रातील अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेत सीमाभागातील कमालनगर तालुक्यातील चोंडीमुखेड गावचे सुपुत्र रामकृष्ण मारोती बिरादार यांनी 488 ऑल इंडीया रॅंक पटकावुन तालुक्यात एक ऐतीहासीक यश मिळवीले आहे. रामकृष्णच्या यशाबद्दल वाडीकर ज्वेलर्स तर्फे त्याचा सन्मान चिन्ह व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी त्याच्या या यशामध्ये त्याला सर्व बाबतीत प्रेरणा देणारे त्याचे मार्गदर्शक मारोती बिरादार यांचा शाल व क्षीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी प्रो.अंगद वाडीकर , संजीवकुमार बिरादार, कपिलकुमार जाधव, मारुतीराव बिरादार, प्रा.प्रदिप बिरादार, अंकुश वाडीकर, गोविंद वाडीकर, डीगबंर वाडीकर, रामदास चाकुरे, इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात सत्कार संपन्न झाला,रामकृष्ण हा शालेय जीवना पासून एक अतिशय अभ्यासू, कुशाग्र बुध्दीमत्तेचा विद्यार्थी असून तो खुप मेहनती आहे. त्याची एकाग्रता कमालची आहे. अभ्यासातील सातत्य, मेहनत, हेच त्याच्या यशाचा गमक आहे. रामकृष्णचे आई-वडील हे दोघेही शिक्षण क्षेत्रात असुन त्यांनी त्याला लहानपणासुनच योग्य असे मार्गदर्शन करुन प्रेरणा देत राहीले. संस्कारित , सांप्रदायिकता अनेक गुण संपन्न असल्यामुळे यशाचे शिखर गाठण्यासाठी सफल झाला आहे.
