राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या स्मृती दिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे, अभिवादन व मानवंदना
उदगीर (एल पी उगिले) राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या प्रमाणात अभिवादन आणि मानवंदना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवभक्त उपस्थित होते.
यामध्ये प्रामुख्याने बिपिन पाटील,संदीप पाटील नंदीबीजलगावकर,चंद्रकांत टेंगेटोल,अभिजीत पाटील, नारायण भोसले, बाबासाहेब सूर्यवंशी,सतीश पाटील मानकीकर, गुणवंत वाडकर,अंकुश ताटपल्ले, सचिन पाटील,पंकज कालानी, कनिष्क शिंदे, प्रतीक पाटील, गणेश पाटील, सुनील पकोळे ,डी.एस.बिरादार ,पवन ढोबळे ,बालाजी बिरादार ,संताजी पाटील ,पवन बिरादार, राम बोरगावे, चंद्रशेखर पाटील इत्यादी मावळे उपस्थित होते.
यावेळी जिजाऊ मासाहेबांच्या विचारांचा वारसा जपला पाहिजेत व त्याच्या विचारानुसार आचरण केले पाहिजे असा निश्चय मावळ्यांनी केला.
