लेप्टन्ट मंथन अंकुश कोणाळे याचा साबणे परिवाराच्या वतीने सत्कार

0
लेप्टन्ट मंथन अंकुश कोणाळे याचा साबणे परिवाराच्या वतीने सत्कार

उदगीर (एल पी उगिले) 6वी पासून सातारा सैनिक स्कूल इथे शिक्षण घेऊन देश सेवेसाठी एनडीए करून लेप्टन्ट म्हणून कार्यरत असलेले लेप्टन्ट मंथन अंकुश कोणाळे यांची नौदलात कारवार येथे नियुक्ती करण्यात आली आहे .
अंकुशचे वडील शिक्षक असल्यामुळे शिक्षण घेण्यास सोयीचे झाले तर आजोबा यांच्याकडून वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन व देश सेवेसाठी घरातील कोणीतरी काम करावे. हे स्वप्न पाहिल्यामुळे आजोबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सैनिकी शिक्षण घेतले. आजोबा दादाराव गणपतरावं कोणाळे एक आदर्श शेतकरी आहेत. जय जवान जय किसान ही प्रेरणा घेऊन त्यांनी मुले घडवली. आपल्या लातूर जिल्हातील विद्यार्थ्यांची पहिल्यांदाच नौदालत लेप्टन्ट म्हणून नियुक्ती झाली आहे. यामुळे कोनाळे कुंटुबांचे सर्वत्र नाव लौकिक होत आहे.
याचेच औचित्या साधून शिवसेना नेत्या प्राचार्य मैनाताई साबणे यांच्या हस्ते लेप्टन्ट झालेल्या मंथन अंकुश कोणाळे याचा सत्कार करण्यात आला.
या वेळी शिक्षक सेनेचे लातूर जिल्हाध्यक्ष प्राचार्य सचिन साबणे, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी तुकाराम साबणे, शिक्षक नेते शिवाजी साखरे (वाघ ), मुलाचे वडील अंकुश कोणाळे, आई सुवर्णा कोणाळे, चुलते लहू कोणाळे, आजोबा दादाराव कोणाळे, आजी लक्ष्मीबाई कोणाळे, निलम सचिन साबणे, चैतन्य कोणाळे, शार्दूल साबणे, रणवीर साबणे,शिवराजे साबणे व प्रेम गिरी उपस्थित होते .

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!