महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात बारावी नवागतांचे स्वागत
उदगीर (एल पी उगिले)
उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात बारावीच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. नवागत विद्यार्थ्यांना वही व पेन देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. स्वागत समारंभात प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, उपप्राचार्य प्रा. एस. जी. कोडचे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक प्रा. एस. व्ही. मुडपे व प्रा. टी. एन. सगर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. महाविद्यालयीन जीवनाचा पहिला दिवस गोड आठवण ठरावा या हेतूने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रा. व्ही. डी. काकनाळे, प्रा.पी.वाय. जालनापुरकर, प्रा. पी. पी. जाहुरे, प्रा.ए. सी. बिरादार, प्रा.एम.डी.धनाश्री, प्रा.एस.बी. बिरादार, प्रा. डॉ. जी. एन. रणवीरकर, प्रा. एस. बी. येडले, प्रा. एस. टी. कांबळे, प्रा. एस. एस. मजगे, प्रा. पी. व्ही. हूडगे, प्रा. एम. डी. समगर, प्रा. पी. बी. बळवंत, प्रा. बी. पी. जाधव, प्रा. ए. के. वळवी, प्रा. एस. एस. स्वामी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यालयीन कर्मचारी दीपक पाटील मलकापूरकर, भीमराव पाटील, अजमुद्दिन शेख, दिलीप होळकर, सूर्यकांत फड यांनी परिश्रम घेतले.
