महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाची एमएचसीईटी परीक्षेत घवघवीत कामगिरी
उदगीर (एल पी उगिले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एमएचसीईट परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. पीसीबी गटात जय शिवकुमार मोतीपवळे याने 97.05 टक्के पर्सेंटाइल गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. जानवी माधव मुगावे हिने 96.78 पर्सेंटाइल गुणांसह द्वितीय स्थान तर साक्षी राजेंद्र शेळके हिने 96.56 पर्सेंटाइल गुणांसह तृतीय स्थान पटकावले.पीसीएम गटात ओम अजय सुगंधी याने 97.29 पर्सेंटाइल गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. वेदिका ज्ञानेश्वर पारसेवार हिने 97.25 पर्सेंटाइलसह दुसरा क्रमांक तर ओमकार दीपक ढगे याने 94.90 पर्सेंटाइलसह तिसरा क्रमांक मिळवला आहे.या यशाबद्दल महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे 75 पर्सेंटाइलपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल 16 आहे. विद्यार्थ्यांचे हे यश कठोर परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि महाविद्यालयाच्या अभ्यासपूर्ण वातावरणाचे फलित असल्याचे प्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांनी सांगितले. त्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बस्वराज पाटील , उपाध्यक्ष अॅड. प्रकाश तोंडारे, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव . मल्लिकार्जुन चिल्लरगे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे आणि प्रा. एस. जी. कोडचे, पर्यवेक्षक प्रा. एस. व्ही.पीमुडपे व प्रा. टी. एन. सगर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
