कृषीदुतांकडून करडखेल येथे सहभागी ग्रामीण मूल्यांकन प्रात्यक्षिक

0
कृषीदुतांकडून करडखेल येथे सहभागी ग्रामीण मूल्यांकन प्रात्यक्षिक

उदगीर (एल पी उगिले)
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाशी (परभणी) संलग्नित कृषी महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा, उदगीर येथील बि. ए.स्सी (मानद) कृषि पदवीच्या सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांसाठीचा अभ्यासक्रम उपक्रम ग्रामीण कृषि जागरूकता कार्यानुभव आणि कृषि औद्योगिक संलग्नता “वर्ष २०२५-२०२६ अंतर्गत उदगीर तालुक्यातील करडखेल या गावामध्ये कृषी दुतांचे सहभागी ग्रामीण मूल्यांकन या प्रात्याशिकाचे सादरीकरण करण्यात आले . यावेळी करडखेल गावातील शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा उदगीर येथील कृषिदुतांनी कार्यक्रम अधिकारी डॉ. जी. एम. हमाने यांचा मार्गदर्शनाखाली सहभागी ग्रामीण मूल्यांकन आणि शिक्षण पद्धती बद्दल माहिती दिली. यावेळी स्थानिक लोकांना त्यांच्या समस्या, गरजा आणि संसाधनांचे विश्लेषण करण्यासाठी सक्रियपणे सहभागी करून त्याना योग्य मार्गदर्शन करण्यात आले , ज्यामुळे ते त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतील .
तसेच पीआरए ची उद्दिष्ट्ये त्यांना सांगण्यात आले , जेणेकरून स्थानिक लोकांच्या गरजा आणि समस्यांचे योग्य आकलन करता येईल. स्थानिक लोकांचा विकास योजना आणि कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी हे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले . स्थानिक लोकांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी या ग्रामीण सहभागी मूल्यांकन प्रात्याशिकाचे आयोजन करण्यात आले .
यांमध्ये सुनील तवर , सागर शिंदे , विराज शिंदे , वैभव सुळे , महेश शिंदे , सूरज शिंदे , सीताराम शहापुरे , गणेश सूर्यवंशी , सुमित सोबाजी हे विद्यार्थी या प्रात्यक्षिक वेळी उपस्थित होते , ग्रामपंचायत समोर रांगोळी काढून त्यामध्ये गावात उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा आणि इतर गावची माहिती यांचे सादरीकरण करण्यात आले , यावेळी करडखेल गावच्या सरपंच सौ. पार्वती नारायण मुसणे , उपसरपंच गिरीश राघू , ग्रामसेवक पी.एन.कानुरे , ग्रामपंचायत सदस्य , तसेच गावातील प्रगतशील शेतकरी शशिकांत वामनराव कंजे , भगवान व्यंकटराव कंजे , राम मुळे , बजरंग बाबुराव कंजे , रामचंद्र बाबूराव कंजे , धोंडीराम अर्जुन मुळे , पंडित अर्जुन मुळे , राजेंद्र गिरी , पांडुरंग गुर्हाळे इ.शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. एन वानोळे, महाविद्यालयाचे, प्राचार्य डॉ. ए. पी. सूर्यवंशी, उप प्राचार्य डॉ.ए.एम पाटील,कार्यक्रम अधिकारी डॉ. जी. एम. हमाने याच्या मार्गदर्शनाखाली सदरील उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!