आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा
उदगीर (एल पी उगिले)
जिल्हा प्रशासन, तालुका महसूल प्रशासन, नगर परिषद उदगीर, पतंजली योग समिती उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे , तहसीलदार राम बोरगावकर , प्रजा पिता ब्रह्मकुमारीच्या संचालिका महानंदा बहेन जी, डॉ. संग्रामजी पटवारी, प्रा.बसलिंग गारठे, राहुल केंद्रे, रामभाऊ तिरुके, भरत चामले , धनराजजी बिरादार, सुरेंद्र अक्कनगिरे अध्यक्ष पतंजली योग समिती, श्रीकांत स्वामी युवा प्रभारी, हनुमंतराव औरादे आप्पा किसान प्रभारी, वीरभद्र कपिकेरे भारत स्वाभिमान प्रभारी, रमेश महाजन,सौ मीनाक्षी स्वामी ,नरेंद्र यन्दे, हणमंतराव औरादे, शिवकुमार सिरगिरे, उमाकांत आंबेसंगे,प्रा. श्रीराम चामले, सुमनताई चव्हाण, सुहास केंद्रे,सुमती भातांबरे अध्यक्ष महिला योग समिती , खताळ महादेव उपाध्यक्ष ,योगशिक्षिका स्मिता पोद्दार, सुनिता गिरी , योगशिक्षिका कबाडे काकू , योगशिक्षक विनायक बिरादार , योगशिक्षक सताळे , बालाजी गवारे , अमोल आणकले , पंडित सूर्यवंशी , नगरपरिषदेचे वैजनाथ बदनाळे, महारुद्र आलट , योगशिक्षक अदेप्पा ताई , अनिता संकाये,सूर्यकांत भुसागरे, ऐनिले सुभाष, पाटील नारायण , शुभम सुपारे व अनेक महिला, पुरुष, लहान बालके या सामूहिक योगसाधनेसाठी उपस्थित होते. याप्रसंगी स्वर्ण माता कन्या विद्या लयातील मुलीनी संगीतमय योगा नृत्य करून सर्वांची मने जिंकली. तसेच सुमनताई यांनी सुंदर स्वागत गीत गायन केले. तसेच योग दिनाबद्दल महानंदा बहेन जी यांनी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांनी योग दिनानिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. डॉ. संग्रामजी पटवारी यांनी पतंजलीचे काम घराघरात पोहोचण्यासाठी मार्गदर्शन केले व पतंजलीचे काम हे सार्वजनिक करायचं सूचना केल्या , स्व. गंगाधर सुपारे यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या योग परीक्षेत प्रथम आलेल्या योगसाधकांना स्मृतिचिन्ह व प्रमाण पत्र वाटप करण्यात आले. अनिता संकाये, अभिजित नळगीरकर, सुधाकर फडसर, कमलाकर कोरेकलकर ई. या बक्षिसाचे मानकरी होते. योग दिना बद्दल प्रास्ताविक करताना सुरेंद्र अकनगीरे यांनी योगाबद्दलचे महत्व प्रतिपादन करत असताना योग साधना करणे किती गरजेचे आहे, यावर त्यांनी भर दिला. योग प्रात्यक्षिक सुरू करण्यापूर्वी उमाकांत आंबेसंगे यांनी शंखनाद करून मंगलमय अशा वातावरणात योग प्रात्यक्षिकाला सुरुवात केले. धनराजजी बिराजदार यांनी योग कार्यक्रमाचे संचलन केले. सूत्रसंचलन नरेंद्र यंदे यांनी केले तसेच प्राचार्य वीरभद्र कप्पीकेरे व स्मिताताई पोद्दार यांनी योगाचे प्रात्यक्षिक करून दाखवले. आभार प्रदर्शन श्रीकांत स्वामी यांनी केले.
