अहमदपूर विधानसभा मतदारसंघात विकासासाठी निधी कमी पडणार नाही – ना. बाबासाहेब पाटील
२५ कोटी रुपयांच्या रस्ते कामाचा शुभारंभ
अहमदपूर (एल पी उगिले) अहमदपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये दळणवळणाच्या साधनांची वाढ करण्यासाठी, विविध रस्त्यांच्या कामांची मूर्तमेढ रोवली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून 25 कोटी रुपयांची केंद्रीय मार्ग निधी योजनेअंतर्गत हाळी – वडगाव – चवळेवाडी – संगाचीवाडी – डोंग्रज या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ संपन्न झाला, अहमदपूर विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी आपण वचनबद्ध असून विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन याप्रसंगी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले आहे.य
पुढे बोलताना पाटील म्हणाले की,
हा रस्ता प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर संबंधित गावांचा परस्परांशी आणि मुख्य बाजारपेठांशी होणारा संपर्क अधिक सुलभ होणार आहे. तसेच, शेतकरी, विद्यार्थी आणि सामान्य जनतेला याचा मोठा लाभ मिळणार आहे.
विकासाच्या कक्षा अधिक रुंदावत असताना रस्ते महामार्ग उत्तम दर्जाचे व्हावेत, त्याचबरोबरीने मतदारसंघाचा देखील विकास व्हावा. यासाठी मी प्रयत्नशील आहे. हा रस्ता दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहावे, असे मत यावेळी व्यक्त केले.
या प्रसंगी तालुका अध्यक्ष शिवाजीराव काळे, कार्यकारी अभियंता श्रीमती अलका डाके, प्रदेश सरचिटणीस शिवानंद तात्या हेंगणे, युवा नेते सुरजभैय्या पाटील, माजी उपसभापती पद्माकरराव पाटील, नगराध्यक्ष करीमसाहेब गुळवे, सभापती मिलिंदराव महालिंगे, सुरज गौंड, गंगाधर आप्पा अक्कानरू, रमाकांत चवळे, उत्तमराव पाटील, निर्मलाताई वाडकर, यशवंतराव जाधव, सुदर्शन मुंढे, बालाजी सूर्यवंशी, राहुल सुरवसे, भानुदास पोटे, मुजम्मिल सय्यद, इलियास सय्यद, मुर्तुजा सय्यद, बालासाहेब पाटील, रामजी कसबे, मारुती माडगे , गणपतराव नितळे, ओम केंद्रे, गणपतराव कवठे, सुभाष चापोले, विष्णू तिकटे, लक्ष्मणराव घुमे, अनिलराव वाडकर, व्यंकटराव कैलवाडे, विश्वनाथ एडके, शिवशंकर हाळे, मेघराज पाटील, समाधान डोंगरे, राजाराम महात्मे, सूर्यकांत केंद्रे, बळीराम भोसले, प्रकाश बडे, गणपतराव मुंढे, संदीप शेटे, मधुकर कांबळे, बिलाल पठाण, सचिन तोरे, सतीश पाटील, गणेश स्वामी, योगेश वाडकर, गणेश पाटील, संगमेश्वर वाडकर, प्रफुल्ल चवळे, सचिन बदनाळे, अंकुश माने, बी.आर भांदे, सर्व पत्रकार बांधव, स्थानिक ग्रामस्थ, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
