विवाहितेचा विनयभंग गुन्हा दाखल
उदगीर (प्रतिनिधी)
उदगीर शहरातील नांदेड नाका परिसरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेस ती त्यांच्या सोमनाथपूर येथील सर्वे नंबर 18 मधील प्लॉट जवळून जाणाऱ्या रस्ता पाहण्यासाठी गेली असता, त्या ठिकाणी रामेश्वर वाडकर यांनी तू या ठिकाणी का आलीस? असे म्हणून वाद घालू लागला. तेव्हा सदरील महिलेने या ठिकाणी माझा प्लॉट आहे. व माझ्या प्लॉट साठी काढलेल्या रस्त्याची पाहणी करण्याकरता आले आहे. असे म्हणाली. तेव्हा त्याने सदरील प्लॉट मी चंद्रकला भुरे यांच्याकडून घेतलेला आहे. असे म्हणून ती महिला पहाणी करत असलेल्या रस्त्याची जागा दाखवून, सदर रस्ता मी खरेदी केलेल्या प्लॉटमध्ये येत आहे. असे सांगून प्लॉट मधून रस्ता का काढला जात आहे. असे सदरील महिलेने विचारताच, वाईट हेतूने हाताला धरून झोंबाझोंबी करून विनयभंग केल्याची तक्रार सदरील महिलेने दिल्यावरून उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कलम 74, 351 (2), 352 भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुरण 399 /25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात अधिक तपास उदगीर ग्रामीण पोलीस करत आहेत.
