रंगकर्मीच्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतून संविधानाचा जागर.
उदगीर (प्रतिनिधी)
संविधान दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रंगकर्मी प्रतिष्ठान च्या वतीने आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाच्या आयोजन केले होते. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागृती निर्माण व्हावी, त्यांना भारतीय संविधानाची ओळख व्हावी या उद्देशाने वक्तृत्व स्पर्धा ठेवून प्रबोधनाचा जागर घालण्यात आला. या स्पर्धेत यशस्वी झालेल्या स्पर्धकांना माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
उदगीर येथील रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने संविधान दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतून बाबासाहेब आंबेडकर शिल्पकार असलेले भारताचे संविधान भारताचा सर्वोच्च कायदा आहे. हा दस्तऐवज मूलभूत राजकीय संहिता, संरचना, कार्यपद्धती, अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्ये आणि मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे आणि नागरिकांची कर्तव्ये निर्धारित करणार्या संविधानाचा जागर घातला गेला.
रंगकर्मी प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत
सांगलीचा प्रणव शशिकांत जाधव प्रथम, लातूर येथील अरब बुशरा जिकर द्वितीय तर संभाजी छत्रपती संभाजीनगर येथील रितेश पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. विजेत्यांना माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांच्या हस्ते रोख पारितोषीके व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी सुप्रसिद्ध साहित्यिक भारत सातपुते, दिलीपकुमार गायकवाड, मनोज दादा पुदाले, दत्ता पाटील, नायब तहसिलदार संतोष धाराशिवकर , रंगकर्मीचे अध्यक्ष प्रा. बिभीषण मद्देवाड यांची उपस्थिती होती.
ॲड.महेश मळगे, हणमंत केंद्रे यांनी स्पर्धेचे परिक्षकाचे काम केले.
स्पर्धायशस्वितेसाठी ज्ञानेश्वर बडगे, विवेक होळसंबरे रंगकर्मीच्या सचिव , प्रा. ज्योती मद्देवाड, उपाध्यक्ष सिध्दार्थ सुर्यवंशी, लक्ष्मणराव बेंबडे, सचिन शिवशेट्टे,, निता मोरे,मनोहर लोहारे, संदीप निडवदे, बाबासाहेब मादळे आदींनी प्रयत्न केले.
