महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने शहरात डॉक्टर्स डे उत्साहात साजरा.

0
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने शहरात डॉक्टर्स डे उत्साहात साजरा.

उदगीर (प्रतिनिधी) अंधश्रद्धा निर्मूलन समिती उदगीर शाखेच्या वतीने डॉक्टर्स डे निमित्त शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांचा सत्कार करून हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला . डॉ विधान चंद्र रॉय यांचा जन्म दिवस व स्मृति दिवस भारतात राष्ट्रीय डॉक्टर दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. डॉक्टरा प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यiसाठी डॉक्टरांचां सम्मान होणे आवश्यक आहे. कोमल हॉस्पिटल चे संचालक तथा उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटिया यांना त्यांच्या सामाजिक, वैद्यकीय,शैक्षणिक कार्याबदल डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला तसेच उदयगिरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे डॉ .माधव चंबुले व डॉ .वडगावे , डॉ स्वामी यांचा सत्कार करून त्यांना डॉक्टर्स डे च्या निमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या .यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ मुडपे गुरुजी , उदगीर शाखेचे उपाध्यक्ष प्रा .बाबुराव माशाळकर , जिल्हा प्रधान सचिव प्रा डॉ .बळीराम भुक्तरे , उदगीर शाखेचे कार्याध्यक्ष प्राचार्य विजयकुमार पाटील , धनंजय गुडसुरकर ,पत्रकार व्ही .एस कुलकर्णी , शिरिष रोडगे , संजय काळे, कांता कलबुर्गे, आदींनी डॉक्टरांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या .
स्पंदन हॉस्पिटल येथे डॉ .सुनील माने यांचाही सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!