रामकृष्ण मध्ये शालेय विद्यार्थी आरोग्य तपासणी.

0
रामकृष्ण मध्ये शालेय विद्यार्थी आरोग्य तपासणी.

उदगीर(प्रतिनिधी) येथील रामकृष्ण इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल येथे बुधवारी शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालय व हॉस्पीटलच्या टीम ने पहिली ते पाचवी वर्गाच्या विद्यार्थी यांची उंची, वजन मौखिक व सर्वसाधारण आरोग्य तपासणी केली. प्राचार्य डॉ. दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रविकांत पाटील, डॉ. शिवप्रताप बिरादार, शिल्पा चुळबुळकर, श्रेया शितळे व दिपाली कदम यांनी आरोग्य तपासणी केली. या उपक्रमासाठी प्राचार्य श्रीपाद सीमंतकर, पद्माकर जाधव, रेणुका विश्वनाथे, मिलिंद कांबळे, अश्विनी कोतवाल, पूजा हिंगमिरे, संध्या सूर्यवंशी, अरुणा उप्पानुर व कावेरी कौळखेडकर यांनी पुढाकार घेतला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!