प्रति वर्षीप्रमाणे दिंडी सोहळा उदगीर शहरात संपन्न
उदगीर (एल पी उगीले) श्री क्षेत्र पंढरपूर येथे पाई जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीला भक्तिमय वातावरणात उदगीर येथील अनेकांनी शुभेच्छा दिल्या.सर्व वारकरी बांधव,विध्यार्थी मित्र,दिंडीत सहभागी झालेल्या शाळा, सर्वपक्षीय कार्यकर्ते, घोडे मालक,मेंढी मालकांचे,दिंडी समितीचे संयोजक अजित शिंदे, चंद्रकांत टेंगेटोल,आशिष पाटील, विकास तपशाळे,सतीश पाटील, संदीप पाटील,विश्वजित पाटील,जय स्वामी आणि विविध गावचे महिला-पुरुष वारकरी यांनी दिंडीत सहभागी होऊन भक्तीरसाचा अनुभव घेतला.
उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे,सुखदेव महाराज,पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून पालकी आणि दिंडी सोहळ्याची सुरुवात झाली. यावेळी ब्रम्हाजी केंद्रे, कल्याण पाटील,सुधीर भोसले,मनोज पुदाले,सुनील जोशी,अनिल पंचाक्षरी, सौदागर माने,राजू निडवंचे,अभंग गायकवाड,राजेश्वर लाळीकर महाराज,दयानंद कल्लूकर, अंकुश ताटपल्ले, विद्यावर्धनी शाळा,महेश प्राथमिक शाळा,राजश्री शाहू माध्यमिक,स्वामी विवेकानंद शाळा, अक्षरनंद शाळा आदींनी सहभाग नोंदवला होता.
