नव्या पोलीस अधीक्षकांचा निर्णय,महिला सुरक्षिततेसाठी ” दामिनी पथक ” पूर्ण वेळ कार्यान्वित,
लातूर (एल पी उगीले ) पोलीस दलातील यापूर्वी फक्त एकच दामिनी पथक कार्यान्वित होते. आता दामिनी पथक अधिक सक्षम बनवुन ते सकाळी 6.00 ते दुपारी 2.00 व दुपारी 2.00 ते रात्री 10.00 अशा दोन सत्रामध्ये कार्यान्वित असणार आहे. दामिनी पथक हे लातूर शहरातील महत्त्वाचे ठिकाणी जसे ट्युशन एरिया, शाळा व कॉलेजेस ज्या ठिकाणी गर्दी होते, त्या ठिकाणी दोन्ही सत्रात पूर्ण वेळ गस्तीवर असणार आहे. त्यामुळे शाळ व कॉलेजच्या मुली, महिला तसेच सजग नागरिक यांना आवाहन करण्यात येते की, आपणास कोणत्याही ठिकाणी टवाळखोर व इतर संशयित व्यक्ती आढळल्यास तसेच कोणतीही तक्रार असल्यास तात्काळ मदतीसाठी मोबाईल क्रमांक 8830115409 व 112 याच्यावर संपर्क करून दामिनी पथकास मदत कामी बोलावून घ्यावे. दामिनी पथक आपणास तात्काळ प्रतिसाद देऊन घटनास्थळी येवुन, त्या टवाळखोरांविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करतील.” चला आपण सुरक्षित व सक्षम लातूर बनवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया.”असे आवाहन लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी केले आहे.
