लातूर (एल पी उगीले) जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार घेतल्यानंतर अमोल तांबे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना भेटी देत असून 2 जुलै रोजी संध्याकाळी पोलीस ठाणे गांधी चौक हद्दीत तसेच गंजगोलाई व परिसरात पायी फिरून परिस्थितीचा पाहणी केली व माहिती करून घेतली. तसेच गंजगोलाई भागातील वाहतूक व्यवस्थेबद्दल माहिती करून घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी गंजगोलाई, सुभाष चौक परिसरातील व्यापाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या, व संबंधीत अधिकारी यांना प्रश्न सोडवणुकी संदर्भाने सुचना केल्या.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) रणजीत सावंत, पोलीस ठाणे गांधी चौक चे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बुद्धीराज सुकाळे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
About The Author