नूतन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा स्वीकारला पदभार…

0
नूतन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा स्वीकारला पदभार…

नूतन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा स्वीकारला पदभार…

अहमदपूर (गोविंद काळे) : सोमवारी लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार नूतन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी आपला पदभार स्वीकारला आहे.
नव्या पोलीस अधीक्षकांचे पोलीस प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले. मावळते पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.
लातूर जिल्ह्याचे मावळते पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांची पुणे येथे बदली झाली आहे. लातूर जिल्ह्यात खूप समाधानकारक काम करता आले जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नागरीक, जिल्हा पोलीस दलातील अधिकारी अंमलदारानी भरपूर सहकार्य केल्या बद्दल त्यांनी आपल्या निरोप समारंभात समाधान व्यक्त केले. लातूर जिल्ह्यात खूप चांगला अनुभव मिळाला खूप काही शिकता आले याबद्दल सोमय मुंडे यांनी आवर्जून उल्लेख केला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नूतन पोलीस अधीक्षकांचे स्वागत व मावळत्या पोलीस अधीक्षकांना निरोपाचा कार्यक्रम पोलीस अधीक्षक कार्यालयच्या मीटिंग हॉल मध्ये संपन्न झाला.
अपर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे, पोलीस उपअधीक्षक गजानन भातलवंडे, यांचेसह लातूर जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणे प्रभारी पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
लातूरकरांच्या सहकार्यामुळे अनेक चांगले उपक्रम लातूर जिल्ह्यात राबविता आले. पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्याला चांगले सहकार्य दिले. जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था, गुन्हेगारी कारवाया यावर वचक ठेवता आला, याबद्दल सोमय मुंडे यांनी समाधान व्यक्त केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!