तरुणांसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राबवणार उद्योजक निर्माण अभियान – युवराज कांडगिरे

तरुणांसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राबवणार उद्योजक निर्माण अभियान - युवराज कांडगिरे

उदगीर (प्रतिनिधी) : सुशिक्षित बेकार, बेरोजगारीला आळा घालण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या उद्योजक निर्माण अभियान राबवत आहे. जास्तीत जास्त लोकांनी या मध्ये सहभागी व्हावे,असे आवाहन प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, लातूर जिल्ह्यातील व उदगीर तालुक्यातील तरूणांना त्यांच्या मनातील उद्योग व्यवसाय उभा करण्यात मदत करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुढे सरसावली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या संकल्पनेतून आणि प्रदेश सरचिटणीस तुषार जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात हे अभियान राबविण्यात येणार आहे ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनाच्या औचित्य साधत काही दिवसांपूर्वी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, या अभियानाची घोषणा करण्यात आली होती. या अभियाना अंतर्गत उद्योग व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांची नोंदणी करण्यात येणार असून, त्यांना केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांची व अनुदानांची माहिती देण्यात येणार आहे. त्याचबरोबर तरुणांना जो उद्योग व्यवसाय उभा करायचा आहे, त्याबाबत तज्ञांचे मार्गदर्शन, उद्योग-व्यवसायाच्या प्रत्यक्ष क्षेत्र भेटी, प्रकल्प अहवाल, भांडवल उभारणीचे पर्याय, यंत्र सामुग्री आणि पायाभूत सुविधा उभारणे, याबाबतचे मार्गदर्शन आणि सहकारी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.          

या उपक्रमाच्या माध्यमातून वर्षभरात किमान पाचशे उद्योजक तयार करण्याचा मानस प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी व्यक्त केला असून राष्ट्रवादी काँग्रेस मराठवाडा विभागाचे अध्यक्ष प्रशांत कदम व जिल्हाध्यक्ष मुस्तफा इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यामध्ये शहरांमध्ये हा उपक्रम राबविणार असून जास्तीत जास्त तरुणांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे लातुर जिल्हा उपाध्यक्ष युवराज कांडगिरे यांनी केले आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!