प्रा.डॉ.रोहिदास माधवराव कदम यांची मराठा सेवा संघ लातूर जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून निवड
प्रा.डॉ.रोहिदास माधवराव कदम यांची मराठा सेवा संघ लातूर जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून निवड
अहमदपूर (गोविंद काळे) : लातूर येथे दिनांक-२८ जुन,२०२५ रोजी मराठा सेवा लातूर संघ जिल्हा कार्यकारणी निवडीसाठी झालेल्या बैठकीत मराठा सेवा संघ कार्यकारणी राज्य निवड समिती प्रमुख मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष संदीपान जाधव,मराठा सेवा संघ जेष्ठ मार्गदर्शक प्रा.अर्जुन तनपुरे, मराठा सेवा संघ कार्यकारणी राज्य निवड समिती सदस्य लिंबराज सुर्यंवंशी, धनंजय पाटील ,केशव ठाकरे ,नारायण काळबांडे यांच्या उपस्थितीत मराठा सेवा संघ पदाधिकारी निवडीसाठी ईशान स्क्वेअर लातूर येथे झालेल्या बैठकीत प्रा.डॉ.रोहिदास माधवराव कदम यांच्या सामाजिक शैक्षणिक कार्याची निवड समितीने दखल घेऊन लातूर जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून निवड केली व राज्य स्तरीय निवड समितीने सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
प्रा.डॉ.रोहिदास माधवराव कदम यांचे मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल सर्वश्री.रोहन जाधव,केंद्रीय कार्यकारणी सदस्य वैभव तळेकर,जिल्हा उपाध्यक्ष बालासाहेब यादव,कमलाकर सुर्यंवंशी,ऋषीकेश कदम,गोविंद शेळके,धनंजय उजनकर प्रा.भिमराव कदम,अशोक चापटे,प्रा.दत्ताभाऊ गलाले,धिरज भंडे पाटील,यशवंत देशमुख,सोमनाथ ताडमे,दत्ता कदम,समर्थ लोहकरे,सिध्दार्थ दापके, शिवशंकर लांडगे,परमेश्वर सूर्यवंशी, ज्ञानोबा भोसले, मुकेश पाटील,भास्कर जाधव, शिवाजी पाटील,सतीश नवटक्के, देवानंद मुळे, शैलेश जाधव,धनराज बोडके,आनंद जाधव,प्रवीण मुळके, जयराम पवार, प्रशांत माने ,विनोद माने ,आकाश शिंदे, यांनी अभिनंदन केले आहे.
मराठा सेवा संघ लातूर जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल प्रा.श्री रोहिदास माधवराव कदम यांच्या निवडीचे लातूर जिल्ह्यात विविध स्तरातून स्वागत होत आहे.
