संत ज्ञानेश्वर विद्यालयात आरोग्य विषयक मार्गदर्शन.
संत ज्ञानेश्वर विद्यालयात आरोग्य विषयक मार्गदर्शन.
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात लिनेस क्लबच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन घेण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय गोदेपुरे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.मीरा गोदेपुरे, माध्यमिक मुख्याध्यापक मीना तोवर सह आदींची उपस्थिती होती. प्रारंभी विद्यालयाच्या वतीने डॉ.विजय गोदेपुरे व डॉ.मीरा गोदेपुरे या उभयतांचा शाल, पुष्पहार व वृक्षाचे रोपटे देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी डॉ.विजय गोदेपुरे यांनी विद्यार्थ्यांना सकस आहार व सुदृढ आरोग्या विषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले तसेच डॉ.मीरा गोदेपुरे यांनीही विद्यार्थ्यांना मानसिक, सामाजिक, भावनिक, शारिरीक आरोग्याबद्दल व अभ्यासा बाबत अनमोल असे मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यालयातील इयत्ता पहिली ते दहावीचे बाराशे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे यांनी केले तर सूत्रसंचालन सतीश साबणे यांनी तर आभार रोकडोबा कुंडगीर यांनी मानले.शेवटी पसायदान घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
