अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू: नांदेड रोडवरील घटना

0
अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू: नांदेड रोडवरील घटना

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू: नांदेड रोडवरील घटना

अहमदपूर (गोविंद काळे) : नांदेड-अहमदपूर रोडवर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका १९ वर्षीय तरूण मोटर सायकल स्वाराचा उपचारा दरम्यान रुग्णालयात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि २ जुलै रोजी घडली असुन या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, दि १ जुलै रोजी रात्री ०८ : ०० च्या सुमारास नांदेड- अहमदपूर रोड वरील रूध्दा पाटी जवळील आर्मी कॅम्प जवळ हा अपघात घडला. संतोष अंकुश सुरनर, वय १९ वर्ष, रा. सुनेगाव ( सांगवी ) ता अहमदपूर हा तरूण आपल्या मोटर सायकल क्र एम.एस ५५ १२३६ वरून सुनेगाव ( सांगवी ) गावाकडून नांदेड -अहमदपूर नॅशनल हायवे वरून अहमदपूर कडे शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल असलेल्या पेशंट साठी जेवणाचा डब्बा घेरुन येत असताना एका अज्ञात वाहनाने त्याला दि १ जुलै रोजी रात्री ०८ : ०० च्या दरम्यान जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की राहुल रस्त्यावर फेकला गेला आणि त्याला गंभीर दुखापत झाली.
अपघाता नंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि संतोष ला शासकीय ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने प्रथमोउपचार करुन शासकीय जिल्हा रुग्णालय लातुर येथे पाठवण्यात आले तेथे उपचार सुरू असताना, मात्र डोक्याला आणि शरीराच्या इतर भागांना झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्याला वाचवता आले नाही. उपचारादरम्यान दि २ जुलै रोजी रात्री त्याचा मृत्यू झाला.
मयताच्या नातेवाईक किंवा घरच्याकडून फिर्याद आली नसल्याच्या कारणामुळे अहमदपूर पोलिसांनी अज्ञात वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल केला नसल्याची प्राथमिक माहीती मिळाली असुन सदरील वाहन हे अवैद्य वाळू वाहतुकीचा हायवा होता असे नागरीकांतुन बोलले जात आहे
या घटनेमुळे नॅशनल हायवे रोडवरील रात्रीच्या वेळी सुरक्षित प्रवासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!