रक्तातील गोडव्यापेक्षा जीवनातील गोडवा वाढवा – डॉ.तुकाराम नलवाड यांचे प्रतिपादन
रक्तातील गोडव्यापेक्षा जीवनातील गोडवा वाढवा - डॉ.तुकाराम नलवाड यांचे प्रतिपादन
अहमदपूर (गोविंद काळे) : सध्या भारतात दहा कोटी लोक मधुमेह आजाराने त्रस्त आहेत तर 13 कोटी लोक प्रीडायबेटिक असून आपण रक्तातील साखर वाढविण्यापेक्षा जीवनातील गोडवा वाढवा असे आवाहन डॉ.तुकाराम नलवाड यांनी केले.
ते संत ज्ञानेश्वर विद्यालयात डॉक्टर्स डे निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे यावेळी व्यासपीठावर डॉ. तुकाराम नलवाड, डॉ. गिरीश देवकत्ते, डॉ. विष्णू माने सह माध्यमिक मुख्याध्यापक मीना तोवर यांची उपस्थिती होती.
मान्यवरांचा शाल व वृक्षाचे रोपटे देऊन शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
डॉ. नलवाड पुढे बोलताना म्हणाले की, सकस आहार व नियमित व्यायाम हा निरोगी जीवनाचा मंत्र आहे. बोर्नविटा हाॅरलिक्स सारखे पदार्थ बंद करा. मैदानी खेळ खेळा.
यावेळी डॉ. विष्णू माने यांनीही विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी सखोल मार्गदर्शन केले. फास्ट फूड आपल्या शरीरासाठी घातक आहेत हे त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. डॉ. गिरीश देवकत्ते यांनीही विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशा रोडगे यांनी केले तर सूत्रसंचालन सतीश साबणे यांनी केले तर आभार मीना तोवर यांनी मानले. शेवटी पसायदान घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
