राज्यस्तरीय तलवारबाजी खेळात कु.क्रांती जकवाड पटकावले सुवर्णपदक

0
राज्यस्तरीय तलवारबाजी खेळात कु.क्रांती जकवाड पटकावले सुवर्णपदक

राज्यस्तरीय तलवारबाजी खेळात कु.क्रांती जकवाड पटकावले सुवर्णपदक

अहमदपूर (गोविंद काळे) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ,संभाजीनगर येथील साई प्रशिक्षण केंद्रात 17 व्या मिनी राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धा दि.27 ते 29 जून 2025 दरम्यान पार पडल्या.यात यशवंत विद्यालयातील कु.क्रांती जालेंदर जकवाड या खेळाडूने महाराष्ट्रात सर्वप्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदक प्राप्त केले.
छत्रपती संभाजीनगर येथील NCO SAI येथे संपन्न असलेल्या 17 वी मिनी स्टेट तलवारबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये कु. क्रांती जालेंदर जकवाड ,कु.सायली विजय वाडकर ,विराज संतोष कदम हे विद्यार्थी U/12 वर्षाखालील गटात सहभागी झाले होते.तलवारबाजी खेळातील खेळाडू क्रांती जालेंदर जकवाड हिने इप्पी वैयक्तिक प्रकारामध्ये महाराष्ट्रात सर्वप्रथम येऊन सुवर्णपदक पटकावले. या यशातून तिची नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
वरील यशाबद्दल टागोर शिक्षण समितीचे सचिव डी.बी.लोहारे गुरुजी,अध्यक्ष डॉ.अशोकराव सांगविकर,उपाध्यक्ष डॉ.भालचंद्र पैके,उपसचिव डॉ. सुनिताताई चवळे,मुख्याध्यापक गजानन शिंदे,उप मुख्याध्यापक माधव वाघमारे,पर्यवेक्षक रामलिंग तत्तापुरे, शिवाजी सूर्यवंशी राज्य क्रिकेट,कबड्डी तलवारबाचे मार्गदर्शक क्रीडा शिक्षक संतोष कदम,कबड्डीचे राज्य पंच क्रीडा शिक्षक दीपक हिंगणे,श्रीमती प्रभावती मिरजकर आदिनी कौतुक व अभिनंदन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!