महात्मा फुले महाविद्यालयात वसंतराव नाईक यांची जयंती साजरी

0
महात्मा फुले महाविद्यालयात वसंतराव नाईक यांची जयंती साजरी

महात्मा फुले महाविद्यालयात वसंतराव नाईक यांची जयंती साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात हरितक्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती ‘कृषी दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वर्गीय वसंतराव नाईक जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी हे होते तर प्रो. डॉ. अनिल मुंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपप्रसंगी उपप्राचार्य डॉ दुर्गादास चौधरी यांनी वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या कार्यावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. पांडुरंग चिलगर यांनी व सूत्रसंचालन प्रा. डॉ. सतीश ससाणे यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. बी.के. मोरे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!