शेतकऱ्यांनी सेंद्रिय आणि रासायनिक शेतीचा समन्वय साधावा – कृषी अधिकारी सचिन बावगे

0
शेतकऱ्यांनी सेंद्रिय आणि रासायनिक शेतीचा समन्वय साधावा - कृषी अधिकारी सचिन बावगे

शेतकऱ्यांनी सेंद्रिय आणि रासायनिक शेतीचा समन्वय साधावा - कृषी अधिकारी सचिन बावगे

अहमदपूर (गोविंद काळे) : सध्याच्या आधुनिक काळामध्ये एकाच पद्धतीच्या शेतीचा अवलंब केला तर शेतकऱ्याला फारशी प्रगती साधता येणार नाही तेव्हा शेतकऱ्यांनी सेंद्रिय आणि रासायनिक या दोन्ही पद्धतीने शेती केल्यास शेतीमध्ये शेतकऱ्यांना प्रगती साधता येते. शेतीमध्ये नवनवीन अवजारे आणि नवीन खते बियाणे चा वापर करून शेतकरी आपला विकास साधू शकतो असा सल्ला उपस्थित शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी श्री सचिन बावगे यांनी दिला.
प्रारंभी माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या फोटोस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले

या कृषी दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्यस्तरीय वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार विजेते श्री धनंजय येलगटे हे होते
वसंतराव नाईक ग्रामीण विकास लोकसेवा संस्थेचे अध्यक्ष श्री एन डी राठोड हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते
या कृषी दिन कार्यक्रमाची प्रस्तावना श्री यशपाल सातपुते यांनी केली
पंचायत समितीचे कृषी अधिकारी श्री यशपाल सातपुते यांनी सुद्धा याप्रसंगी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले
या कृषी मेळाव्यामध्ये राज्यस्तरीय वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार विजेते लिंगाळ गावचे श्री धनंजय येलगटे यांचा शाल पुष्पहार पुष्पगुच्छ नारळ आणि श्री अन्न आणि पोषण हे कृषी ग्रंथ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच पीक स्पर्धेमध्ये विजेते ठरलेल्या शेतकऱ्यांचाही येथे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यामध्ये भरत नारायण राख राहणार मोहोळ यांना प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही येथे सन्मान करण्यात आला तसेच अमोल दिगंबर जाधव राहणार काळेगाव यांना द्वितीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेमध्ये सूर्यकांत नामदेव फड राहणार हिंगणगाव यांना तृतीय पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री एन डी राठोड यांनी वसंतरावजी नाईक यांच्या एकूणच कार्याबद्दल उपस्थितांना माहिती दिली
या कार्यक्रमांमध्ये विविध क्षेत्रात प्रगती साधलेल्या महिलांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
कार्यक्रमात सर्व शेतकरी आणि महिला यांना ” श्री अन्न आणि पोषण ” हा कृषी ग्रंथ वाटप करण्यात आला.
हा कृषी मेळावा यशस्वी करण्यासाठी पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासनाधिकारी श्री शैलेश जोशी, कृषी विस्तार अधिकारी श्री ऐनलवार जी आर श्री एस एम केंद्रे, श्री धनाजी सुळे,विस्ताराधिकारी पंचायत श्री आर व्ही पट्टेवार, श्री साचणे यांनी परिसर्म घेतले
या कृषी मेळाव्याचे सूत्रसंचालन श्री भारती साहेब यांनी केले. सर्वांचे आभार श्री धनाजी सुळे यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!