वसंतराव नाईक यांनी मराठी भाषेला राज भाषेचा दर्जा दिला – माजी मंत्री बाळासाहेब जाधव
वसंतराव नाईक यांनी मराठी भाषेला राज भाषेचा दर्जा दिला - माजी मंत्री बाळासाहेब जाधव
अहमदपूर (गोविंद काळे) : भारत हा खंडप्राय देश आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रा सारखे अनेक राज्य आहेत. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या मंत्रिमंडळात वसंतराव नाईक महसूल मंत्री झाले
5 डिसेंबर 1963 ला वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
शासकीय कामकाजात हिंदी भाषेचा अंमल हे वसंतराव नाईक यांना रुजले नाही 1964 ला शासकीय कामकाज मराठीतून व्हावे अशी विधिमंडळाची मंजुरी घेतली आणि एक मे 1966 पासून सर्व शासकीय कामकाज मराठीतून होईल अशी घोषणा वसंतराव नाईक यांनी केली. अशी माहिती माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांनी वसंतराव नाईक यांच्या 112 व्या जयंतीदिनी दिली.
काल दिनांक 1 जुलै रोजी अहमदपूर येथील टेंभुर्णी रोडवरील वसंतराव नाईक चौक येथील वसंतराव नाईक यांच्या अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होत
त्यांनी पुढे सांगितले की वसंतराव नाईक हे पंचायती राजचे जनक असून त्यांच्या अहवालामुळे महाराष्ट्रात जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निर्माण झाल्या. त्यांनी औद्योगिक क्षेत्रामध्ये अमुलाग्र काम केले
महाराष्ट्राला चार कृषी विद्यापीठ देऊन महाराष्ट्र सुजलाम सुजलाम केला. महाराष्ट्रात रोजगार हमी योजना चालू करून दुष्काळातून महाराष्ट्र वाचवला. त्यांच्या मेहरबान्कीनेच मी महाराष्ट्राच्या रोजगार हमी योजनेचा अध्यक्ष झालो
वसंतराव नाईक यांनी चालू केलेल्या अनेक योजना आजही चालू आहेत.
1963 ते 1975 पर्यंत अखंड 12 वर्ष वसंतरावजी नाईक यांनी यांनी महाराष्ट्राची इमाने इतबारे सेवा केली
सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष समन्वयाने आणि एकजुटीने कार्य करायचे. कोयना भूकंपाच्या काळात विरोधी पक्षातील आमदारांनी आणि सत्ताधारी पक्षातील आमदार आणि मंत्री यांनी रात्रंदिवस खपून भूकंपग्रस्तांसाठी 10000 घरे बांधून दिली. रोजगार हमी योजना चालू करण्यासाठी एक लाख रुपये निधी जमा करायचा होता विरोधी पक्षातील आमदारांनी पुढाकार घेऊन तो निधी जमा केला एवढे समन्वय सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये होते हे सारे वसंतराव नाईक यांच्या सौजन्य वृत्ती मुळेच व्हायचे असेही त्यांनी सांगितले
या कार्यक्रमात अमित भैया रेड्डी सोमप्रकाश सूर्यवंशी हरिभाऊ नागमोडे एल डी कांबळे श्रावण वाघमारे श्री देव हारे प्राध्यापक डॉक्टर जीवन गंगणे गौतम वाघमारे विक्रम सिंह कचवे माधव तिगोटे विलास पडिले धर्माधिकारी पांडुरंग डी एस वाघमारे एन डी राठोड अविनाश मंदाडे गणेश वाघमारे अनंतराव कदम राजकुमार गायकवाड पंढरी वाघमारे प्राध्यापक गौतम वाघमारे श्री बाबळ सरे ओंकार पाटील श्री प्रकाश देशपांडे गंगाधर कानगुले ज्ञानोबा गायकवाड हिरामणी धसवाडी कर शिवराज राठोड धर्मपाल गायकवाड पांडुरंग चव्हाण मंडळ अधिकारी आर जी कांबळे चंद्रकांत राठोड धोंडराम राठोड शेषेराव राठोड एडवोकेट राजपाल गायकवाड कॉन्स्टेबल गोविंद पवार बंजारा समाज परिवर्तन अभियान चे जिल्हा अध्यक्ष श्री नाथराव राठोड बोधिसत्व फाउंडेशन चे संस्थापकीय अध्यक्ष आरजी कांबळे पोलीस कॉन्स्टेबल मनोहर राठोड मंडळ अधिकारी सोनकांबळे साहेब प्राध्यापक भगवान अमलापुरे बाबुभाई पठाण रियाज पठाण सुनील गायकवाड प्रफुल धामणगावकर
अमोल राठोड एच आर राठोड भाजीविक्रेते श्री श्रावण यांनी सुद्धा वसंतराव नाईक यांना अभिवादन केले.
चार तास चाललेल्या या अभिवादन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन डी राठोड यांनी केले तर शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते धर्मपाल गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.
