फ्रेंडशिप डे ला झाडांशी मैत्री
लातूर (प्रतिनिधी) : ऑगस्ट महिन्याची सुरुवात झाली, की तरुणाईला वेध लागतात ते ‘फ्रेंडशिप डे’चे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी आपल्या मित्र-मैत्रिणींना ‘फ्रेंडशिप बँड’ बांधून हा दिवस साजरा केला जातो; मात्र या वर्षी लातूर शहरात हा दिवस झाडांशी मैत्री करून साजरा केला जाणार आहे. त्यासाठी ग्रीन लातूर वृक्ष टिमच्या पर्यावरणप्रेमी तरुणांनी पुढाकार घेतला आहे. ग्रीन लातूर वृक्ष टीम, जलसंपदा विभाग लातूर, जिओलाईफ फाउंडेशन पुणे यांच्या वतीने जुना औसा रोड येथे ४००० झाडांचा ऑक्सीजन पार्क उभा करण्यात आला आहे. या ऑक्सीजन पार्क मध्ये २४ तास ऑक्सिजन देणारी झाडे, पर्यावरण पूरक, पक्ष्यांकरिता उपयोगी, प्रदुषण कमी करणारी, आयुर्वेदिक महत्व असणारी अशी पिंपळ, वड, करंज, मोहगणी, चिंच, शिरीष, कांचनार, आवळा, टीकोमा, जांभूळ, पेरू, अर्जुन, रिठा, पारस पिंपळ, काटेसावर इत्यादी लहान मोठी झाडे लावून घनदाट वन प्रकल्प उभा केला जात आहे. त्यातून शहरातील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल शहरात वृक्षांची संख्या वाढेल. पक्ष्यांना निवारा भेटेल, त्यांना खाद्य मिळेल. ग्रीन लातूर वृक्ष टीम ही एक लोकचळवळ आहे, लातूर जिल्ह्यात अविरतपणे गेल्या ७९० दिवसांपासून ६५ हजार पेक्षा अधिक वृक्षांची लागवड करून त्यापेक्षा दीडपट अधिक वृक्षांचे संवर्धन करणे सुरू आहे. लातूर जिल्ह्यात अखंड, अविरतपणे गत ७९० दिवसात ६६ हजार झाडांची वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन ग्रीन लातूर वृक्ष टिमच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
एक झाड माझ्या शहरासाठी
एक झाड माझ्या प्रियजनांसाठी
एक झाड माझ्या मित्रासाठी
एक झाड माझ्या भविष्यासाठी
एक झाड मराठवाड्यातील दुष्काळ संपवण्यासाठी
एक झाड प्रदुषण कमी करण्यासाठी
या ऑक्सीजन पार्क मध्ये सर्व लातूरकरांच्या शुभ हस्ते झाड लागावे ही ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सर्व सदस्यांची इच्छा आहे म्हणुन समस्त लातूरकरांनी रविवारी एक ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता जुना औसारोड वरील पाटबंधारे विभागाच्या तेरणा वसाहत येथे येऊन झाड लावावे असे आवाहन ग्रीन लातूर वृक्ष टिमच्या डॉ पवन लड्डा, नगरसेवक इम्रानजी सय्यद, डॉ. भास्करराव बोरंगावकर, पद्माकरजी बागल, डॉ. जयंत पाटील, मोईझ मिर्झा, गंगाधर पवार, प्रमोद निपाणीकर, मनमोहन डागा, ऍड वैशाली यादव, कल्पना कुलकर्णी, मीनाक्षी बोंडगे, सार्थक शिंदे, प्रसाद शिंदे, प्रसाद श्रीमंगले, ऍड व्यंकटेश बेल्लाळे, महेश गेलडा, सिताराम कनजे, कल्पना फरकांडे, डी. एम. पाटील, बळीराम दगडे, विक्रांत भूमकर, कृष्णा वंजारे, आशा अयाचित, युगा कनामे, प्रिया नाईक, मोहिनी देवनाळे, निकिता कावळे, बळीराम दगडे, राहुल माने, विदुला राजमाने, सादिक कमलापुरे, खाजा पठाण, शैलेश सूर्यवंशी, बालाजी उमरदंड, नागसेन कांबळे, कुंदन सरवदे, बाळासाहेब बावणे, डॉ अमृत पत्की, असिफ तांबोळी, फारूक शेख, अरविंद फड, पुजा पाटील विकास कातपुरे, वैशालिताई पाटील, विजयकुमार कठारे, सुरज साखरे, वैजनाथ वानखेडे, नितीन पांचाळ, नितीन कामखेडकर, मुकेश लाटे, पांडुरंग बोडके, साहिल जाधव, कांत मरकड, डॉ. साफल्य कडतने, स्वाती यादव, तौसीफ सय्यद वतीने केले जात आहे.