अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी विविध कृषि योजनेसाठी अर्ज करावेत
लातूर (प्रतिनिधी) : राज्यातील अनुसचित व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून जीवनमान उंचविण्यासाठी अशा शेतकऱ्यांना शेती अर्थसहायासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वालंबन योजना व बिरसा मुंडा योजना कृषि क्रांती योजना सन 2021-22 साठी राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज mahadbtmahait.gov.in या पोर्टलवर स्वीकारण्यात येत आहेत. तरी नजीकच्या सामुदायिक सेवा केंद्र, महा ई-सेवा क्रेद्र ग्रामपंचायत कार्यालयातून अर्ज करावेत. या योजनेत अंर्तभूत घटक नवीन विहिरजुनी, विहिर दुरूस्ती, शेततळयांचे प्लॉस्टीक आस्तरीकरण तसेकच इतर बाबीमध्ये वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन संच, ठिबक सिंचन, तुसार सिंचन संच परसबाग, पंपसंच (डिझेल/विद्युत))पीव्हीसी पाईप अशा विविध गरज असलेल्या बाबरी निवडून अर्ज करावेत.
अर्ज करताना सातबारा आठ अ,पासबुक,आधारकार्ड व मोबाइर्लसह उपस्थित राहून अर्ज करावेत.अर्ज केल्यानेतर शासनाच्या पोर्टलवरून लॉटरीमध्ये आपली निवड झाल्यानंतर आपणास कागदपत्रे दिलेल्या मुदतीत आपलोड करावी लागतील. लाभार्थ्यांचया अटी शर्तीमध्ये उत्पन्न 1 लाख 50 हजार कमीत कमी क्षेत्र 0-4 हेक्टर व जास्तीत जास्त 6 हेक्टरची मर्यादा, जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. नवीन विहिरी व्यतीरिक्त इतर बाबीसाठी कमीत कमी 0.20 हेक्टर क्षेत्र असावे.तरी अशा जास्तीत जास्त शेतकऱ्यानी अर्ज करावेत, असे आवाहन कृषि व पशुसंवर्धन समिती चे सभापती गोविंद चिलकुर व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनय गोयल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी संतोष जोशी, कृषि विकास अधिकारी चोले एस.आर. यांही केले आहे.