बावकरांची टीम लय भारी !! पकडले गावठी पिस्टलधारी !!

0
बावकरांची टीम लय भारी !! पकडले गावठी पिस्टलधारी !!

लातूर (एल पी उगीले) लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला पोलीस निरीक्षक म्हणून सुधाकर बावकर रुजू झाल्यानंतर त्यांचे संपूर्ण पथकच नव्या नव्या गुन्ह्याचा शोध घेणे आणि गुन्हेगारावर वचक निर्माण करणे यासाठी तत्परतेने कार्यरत झाले आहे. आठ जुलै च्या पहाटे गावठी पिस्तूल घेऊन संशयितरित्या लातूर ते औसा रोडवर जात असल्याची माहिती समजताच तत्परतेने जाऊन चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात दिनांक 7 जुलै ते 8 जुलै च्या मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या होत्या. याच दरम्यान त्यांच्या हालचाली बाबत माहिती घेण्यात येत होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, काही इसम गावठी पिस्टल जवळ बाळगून लातूर ते औसा जाणाऱ्या रोडवर कार मधून संशयितरित्या फिरत आहेत. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकाने लातूर ते औसा जाणाऱ्या रोडवरील एका पेट्रोल पंपा समोर थांबलेल्या कार मधील इसमांना ताब्यात घेत असताना अंधाराचा फायदा घेऊन सहा जणांपैकी दोन इसम पळून गेले. उर्वरित चार जणांना ताब्यात घेऊन त्यांची व पळून गेलेल्या इसमा बाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव राहुल भगवान खिल्लारे (वय-28 वर्ष रा. आंबेडकर नगर हिंगोली), विशाल देविदास कदम, (वय-27 वर्ष रा. जयभीम नगर नांदेड), राहुल वामन चिकलीकर (वय-41 वर्ष रा. जयभीम नगर नांदेड)
राहुल प्रकाश घोडजकर (वय-32 वर्ष रा. सावित्रीबाई फुले नगर नादेड), आमोल मधुकर वन्ने (रा. जयभीम नगर नांदेड (फरार)),राधे सुर्यतळ (रा. आंबेडकर नगर,नांदेड (फरार))असे असल्याचे सांगितले. त्यांचे ताब्यातील पांढ-या रंगाची एम.एच 02 एफ.एन 3444 ईस्टीगा कंपनीच्या कारची झडती घेतली असता त्यामध्ये एक स्टीलचा गावठी बनावटीचा पिस्टल अनाधिकृत व बेकायदेशीररीत्या मिळुन आले.
त्यावरून नमूद इसमांना ताब्यात घेऊन 50 हजार रुपयाचे गावठी पिस्टल व 7 लाख रुपयाची ईरटीका कार असा एकूण 7.5 लाख रुपयाच्या मुद्देमालासह पुढील कार्यवाही करिता पोलीस ठाणे विवेकानंद चौक यांच्या ताब्यात देण्यात आले असून भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यात येत असून पोलीस ठाणे विवेकानंद चौक पुढील तपास करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथका मधील पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अमलदार साहेबराव हाके, रियाज सौदागर, योगेश गायकवाड, मनोज खोसे, गोविंद भोसले, चंद्रकांत केंद्रे, सचिन मुंडे यांनी केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!