स्वयंलेखन उपक्रमाचा भव्य शुभारंभउदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालय, उदगीर आयोजित

0
स्वयंलेखन उपक्रमाचा भव्य शुभारंभउदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालय, उदगीर आयोजित

उदगीर (प्रतिनिधी) : उदयगिरी लॉयन्स धर्मादाय नेत्र रुग्णालय, उदगीर आणि अरुणा अभय ओसवाल रिसोर्स सेंटर फॉर द ब्लाइंड (The Blind T.H.I. Eye) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ८ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ४ वाजता स्वयंलेखन उपक्रमाचा भव्य शुभारंभ उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटिया सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध लेखक दीपक बलसूरकर, मुरलीधर जाधव यांची उपस्थिती लाभली.
व्यासपीठावर प्रा. राजेंद्र चव्हाण, प्रा. राजकुमार मुक्कावार हे ही मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात श्रीकांत पंचगुडे या दृष्टीहीन व्यक्तीने स्वतः स्वयंलेखनाचे प्रात्यक्षिक सादर केले. या कोर्सच्या माध्यमातून कोणताही नेत्रहीन विद्यार्थी स्वतःहून लेखन करू शकतो आणि स्वतःचा पेपर देखील लिहू शकतो, ही गोष्ट उपस्थितांसमोर ठळकपणे अधोरेखित झाली.या उपक्रमाचे आयोजन यशस्वीपणे सेंटरचे समन्वयक प्रा. राजेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अर्चना माने,अजय भालेराव ,आणि गणेश मुंडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमास दृष्टीहिन विद्यार्थी आणि डीडीयू-जेकेवाय चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रा. राजेंद्र चव्हाण सर यांनी मार्मिक प्रस्ताविकेने केली, तर आभारप्रदर्शन सचिन बामणवाड यांनी केले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या स्वयंलेखन उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले आणि उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!