उदगीर शहरातील रस्ते उखडले, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवक काँग्रेस कडून निवेदन

0
उदगीर शहरातील रस्ते उखडले, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवक काँग्रेस कडून निवेदन

उदगीर (प्रतिनिधी)
उदगीर शहरातील विकास नगर, श्रीकृष्ण कॉलनी, उदयगिरी हॉस्पिटलच्या बाजूचा रस्ता, दूध डेरीच्या पाठीमागील रस्ता, सोन्या मारुती मंदिर परिसराजवळ रस्ते खड्डेमय झाल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. या खड्डेमय रस्त्यामुळे छोटे छोटे अपघात दररोज घडू लागले आहेत. विशेषतः शाळा सुरू झालेल्या आहेत, विद्यार्थ्यांना शाळा आणि शिकवणीसाठी या मधल्या रस्त्याने ये जा करणे जवळचे ठरते, परंतु रस्त्यावर झालेल्या खड्ड्यात पाणी साचल्यास विद्यार्थ्यांना रस्त्याचा अंदाज न आल्याने अनेक वेळा गणवेश घातलेली विद्यार्थी त्या पाण्यात पडतात आणि शाळेला जाणे त्यांना कठीण होते. तसेच वयोवृद्ध नागरिकांना देखील चालणे देखील या रस्त्याने कठीण झाले आहे. या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून उदगीर शहर युवक काँग्रेसच्या वतीने नगरपरिषद प्रशासन यांनी लक्ष घालावे आणि लवकरात लवकर या रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, आणि नागरी सुविधा पुरवाव्यात. अशा पद्धतीची मागणी करणारे निवेदन युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आले आहे. सदरील निवेदनावर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रवीण पटवारी, प्रशांत हुडगे, सोशल मीडिया अध्यक्ष पवन सूर्यवंशी, ओबीसी युवक शहराध्यक्ष मंगेश येरगुंडे, अनुराधा भोसले, अविनाश खरात, सतीश बिरादार, विशाल बिरादार इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार असल्याने या निवडणुकीला सामोरे जाण्याच्या उद्देशाने विद्यमान प्रशासन कालखंडातील गलथान कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी काँग्रेस सरसावली आहे. शहरातील नागरी सुविधांच्या अभाव आणि रस्त्याची दुर्दशा या गोष्टीला प्राधान्यक्रम देत काँग्रेसने आवाज उठवला आहे. सदरील रस्ते वेळीच दुरुस्त नाही केल्यास तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!