श्रीकांत पाटलाच्या वाढदिवसाने महाविकास आघाडीत नवचैतन्य

0
श्रीकांत पाटलाच्या वाढदिवसाने महाविकास आघाडीत नवचैतन्य

उदगीर (ॲड. एल पी उगिले)
उदगीर शहरातील काँग्रेस पक्षाचे युवा नेते तथा उदगीर शहरातील काँग्रेसच्या पाठीचा कणा म्हणून ओळखले जाणारे धडाडीचे नेते श्रीकांत पाटील यांचा नुकताच वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचे कार्य श्रीकांत पाटलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाविकास आघाडीने केले आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. शहरातील अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. श्रीकांत पाटील मित्र मंडळाच्या वतीने तसेच चंद्रकांता वैजापूरे प्रतिष्ठानच्यावतीने शहरातील प्रत्येक प्रभागात अनेक उपक्रम राबविण्यात आले. विशेषतः युवा नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाच्या वतीने वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे ही कार्य केले तसेच पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी विद्यार्थ्यांना प्रबोधन करून वृक्ष संवर्धनाचे धडे देण्यात आले यासोबतच अनेक आश्रम शाळातून विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले तसेच रोटी कपडा बँकेच्या वतीने बेघर निवारा केंद्रातील नागरिकांसोबत स्नेहभोजन आणि फळांचे वाटप करण्यात आले त्यासोबतच आपल्या नेत्याचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने करावा या उद्देशाने काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या वतीने प्रत्येक प्रभागातून युवा मेळावे घेऊन जनजागृती करून समाजसेवेचा वसा घ्यावा असे मार्गदर्शन अनेक नेत्यांनी केले.
सचिन वाघमारे यांच्या वतीने संचलित करण्यात आलेल्या संस्कार निवासी ज्ञानगृहात देखील आपल्या युवा नेत्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करून त्या ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांना मिष्ठांन भोजन देण्यात आले.
युवा नेते श्रीकांत पाटील यांच्या वाढदिवसासाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याणराव पाटील, सचिन वाघमारे, केमिस्ट्री किंग प्रा. प्रदीप वीरकपाळे, इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा. सिद्धेश्वर पटणे,चैतन्य फरसणे, ओमकार वाघमारे, पवन सूर्यवंशी, प्रभाकर सूर्यवंशी, प्रवीण पटवारी, संतोष चौधरी, श्रीनिवास श्रीनेवार, रमण आदावळे, मंगेश एरगुंडे, मिथुन शिंदे, अजय माका, अनुराग भोसले, सतीश बिरादार, संतोष सूर्यवंशी, विजय भोसले, दत्ता खांकरे, सोनू पिंपळे, बालाजी पाटील नेत्रगावकर, सुशील कुमार पांचाळ, श्रीनिवास एकुरकेकर, अजय कपाळे, माकेश्वर बिरादार, विकास बिरादार, पद्मसिंह करखेलीकर, कनिष्क शिंदे, फय्याज डांगे, सद्दाम बागवान इत्यादी कार्यकर्त्यांनी श्रीकांत पाटील यांना सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत.

चौकट…….
नगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसचा कार्यक्रम…..

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रभाग निहाय कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी युवा नेते श्रीकांत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अनेक कार्यक्रम घेण्यात आले. तसेच आपापल्या प्रभागातील अडीअडचणी जाणून घेऊ, त्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रशासकांना निवेदन देणे, जनतेच्या दरबारात जाऊन आपण करत असलेल्या कामाची माहिती सांगणे, काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहोचवणे. सर्वधर्मसमभाव ही विचारधारा काँग्रेसचे असल्याने सर्वांना सोबत घेऊन चालणारा पक्ष म्हणून काँग्रेसची ओळख सर्वांना करून देणे. अशा पद्धतीच्या कार्यक्रमाची रेलचेल श्रीकांत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाने केली होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!