पतंजली योग समिती मार्फत गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम उत्साह साजरा

0
पतंजली योग समिती मार्फत गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम उत्साह साजरा

उदगीर (एल पी उगीले)
पतंजली योग समिती उदगीरच्या कार्यालय मध्ये गुरु पौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. उदगीर मध्ये योगाची सुरुवात करणाऱ्या डॉ. संग्रामजी पटवारी यांच्या अध्यक्षतेखाली गुरु पूर्णिमा साजरी करण्यात आली. याप्रसंगी पतंजली योग समितीचे सर्वच योगप्रेमी, योगसाधक, योगशिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते. प्रथमता ओमच्या प्रतिमे चे पूजन करण्यात आले. त्यानंतर धनराज बिरादार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ संग्रामजी पटवारी यांनी योग साधनेचे महत्त्व सर्वांपुढे विशद केले. पतंजली ऋषींनी सांगितलेल्या पतंजली योग सूत्रातील अष्टांग योगाचा अवलंब प्रत्येक योगसाधकांनी केला पाहिजे. यावर डॉ. सग्रांम पटवारी यांनी भर दिला.अष्टांग योगातील यम, नियम, आसन,प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी या अंगाचा प्रत्येकाने अभ्यास करावा. तसेच या अष्टांग योगाच्या माध्यमाने स्वतःच्या जीवनाचे कल्याण करून घ्यावे. असे डॉ. पटवारी यांनी सांगितले. याप्रसंगी प्रा. श्रीराम चामले, औरादे अप्पा, रमेश जी महाजन यानेही गुरुबद्दलचे महत्त्व सर्वात पुढे विशद केले. याप्रसंगी उपस्थित उमाकांत अंबेसंगे, शिवकुमार शिरगिरे, अभिजीत नळगीरकर,बारमळे उत्तम,श्रीमती भगवती टवानी,सौ.अनिता संकाये, शकुंतला शेळके,अकुंश हुंडेकर, वीरभद्र कप्पीकेरे, भोसगे चद्रकांत ,कोराळे संतोष,बसवराज स्वामी, विलास मेंहत्रे,गोविंद टवटेवाड, मिरजकर डि.पी.,मुरलीधर बिरादार, कुट्टे भगवानराव, कमलाकर कोरैकलकर, अड़ रमाकांत चटनाळे, डाके विजयकुमार, हणमंते डि.के., कमलाकराव भोरेवार,सुधाकरराव नळगीरकर, धुळप्पा मळचापुरे,जाधव मारोती,केन्द्रे शिवाजी,एकलिंगे राजकुमार,फड सुधाकर,नारायण भोसले,ऐनिले सुभाष,सुर्यकांत भुसागरे,नारायण पाटील ईत्यादी योग साधक, योगशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नरेंद्रजी यंदे यांनी केले. योग साधक, योगशिक्षक, युवक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!