वयोगट 14 व 17 वर्षाच्या आतील जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत सैनिकी विद्यालय प्रथम
उदगीर(प्रतिनिधी)
श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय अंडर 14 व 17 सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
लातूर येथील वर्ल्ड पिस पब्लिक स्कूल या विद्यालयात जिल्हास्तरीय अंडर 14 व 17 सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सैनिकी विद्यालयाच्या दोन्ही संघातील विद्यार्थ्यांनी आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
अंडर 17 या फुटबॉल टिमचा कर्णधार विनायक मिरकल तर उपकर्णधार म्हणून शिवप्रसाद काळे यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे.
अंडर 14 या फुटबॉल टिमचा कर्णधार संदेश घाटंग्रे तर उपकर्णधार म्हणून आदित्य पोकले यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे.
या सर्वच यशस्वी खेळाडूंचे व यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक शिवकुमार कोळ्ळे, शिक्षण निदेशक सुधीर गायकवाड, गोविंद डिगोळे यांघे अभिनंदन प्राचार्य वसंत कुलकर्णी, पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के, विभाग प्रमुख प्रा. प्रदीप कोठारे, संतोष चामले, विलास शिंदे, सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.
