श्री गुरु हावगी स्वामी मठात गूरु पोर्णिमा उत्सव संपन्न
उदगीर (प्रतिनिधी) गुरु पोर्णिमेनिमित्त श्री गुरु हावगीस्वामी मंदिर येथे ष.ब्र. १०८ डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य सानिध्यात शिव दिक्षा व गुरुसंस्कार सोहळा संपन्न झाला.
गुरुपर्णिमेनिमित्त श्री. गुरु हावगीस्वामी मठ येथे पहाटे ५.०० वाजल्यापासुन असे सांगितले विविध कार्यक्रम संपन्न झाले. सौ. मंगलबाई मन्मथप्पा मठपती, सौ. वैशाली विरभद्र मठपती स्वामी सताळकर यांच्या वतीने गुरवर्यांची पाद्य पूजा संपन्न झाली. यावेळी ७ वाजता गुरुवर्यांच्या उपस्थितीत १४० भक्ताना शिवदिक्षा व गुरुसंस्कार सोहळा संपन्न झाला. सकाळी ११
वाजता गुरवर्यांची सामुहिक पाद्दपुजा पौरोहित्यकार शिवराज महाराज हाळीकर, शंकर महाराज, अजय महाराज, शिवशंकर महाराज, बाबु महाराज, शिवसांब महाराज, देवानंद महाराज, सुनिल महाराज यांच्या वेदमंत्रोच्चार संपन्न झाली. यावेळी आपल्या अशिर्वचनात गुरुवर्य डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज म्हणाले की, गुरुशिवाय मानव मुक्ती नाही. जिवनातील अंधकार दुर करणारा गुरु आहे. गुरुच्या आशीर्वादाशिवाय ज्ञान प्राप्ती नाही, असे सांगुन नमस्काराचे प्रकार सांगुन एकांग नमस्कार, दिव्यांग नमस्कार, त्रियांग नमस्कार, पंचाग नमस्कार व साष्टांग नमस्कार करण्याचे प्रकार व पध्दती सांगीतले.
गुरुवर्यांच्या आशीर्वाचनानंतर विरभद्र महाराज सताळक यांच्या हस्ते महामंगल आरती झाली. तिर्थप्रसाद व महाप्रसादाने गुरुपोर्णिमा उत्सावाची सांगता झाली. महाप्रसादाचे अन्नदाते विरभद्र स्वामी सताळक यांनी गुरुपोर्णिमा उत्सव कार्यक्रमास आंध्र, कर्नाटक, तेलंगणा राज्यातील भाविक भक्त उपस्थित होते.
