शिवाजी आपटे यांना सुरज सिंह मारण समाजकार्य राष्ट्रीय शिखर पुरस्कार

0
शिवाजी आपटे यांना सुरज सिंह मारण समाजकार्य राष्ट्रीय शिखर पुरस्कार

उदगीर (प्रतिनिधी)
उदगीर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा तोंडार येथील माजी सरपंच शिवाजीराव आपटे यांच्या समाजकार्याची दखल भोपाळ येथील निर्दय प्रकाशन यांनी घेऊन त्यांच्या 52 व्या वार्षिक उत्सवाच्या दरम्यान भोपाळच्या गांधी भवन येथील मुख्य सभागृहामध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमात श्री चिन्मय मिश्र व निर्दय प्रकाशन चे मुख्य संपादक कैलास आदमी यांच्या हस्ते महाराष्ट्रातून शिवाजीराव आपटे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. देश विदेशातील साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती यांना वेगवेगळे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी 17 राज्य आणि चार देशातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या नामांकित शेकडो लोकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. निर्दलीय प्रकाशन हे निर्भय, निर्वैर्य व निपक्ष विचारधारेने चालणारे दैनिक, मासिक व साप्ताहिक प्रकाशन आहे. त्यांच्या प्रकाशनाचेही कार्य मोठे असून थोर सर्वोदयी चिन्मय मिश्र तसेच वरिष्ठ पत्रकार महेंद्र तिवारी, प्रसिद्ध लेखिका, कवयित्री श्रीमती वाणी कर्ण काठमांडू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. लातूर जिल्ह्यातील शिवाजी आपटे यांना सुरज सिंग मारण समाजकार्य राष्ट्रीय शिखर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!