महसूल अभियान सप्ताह निमित्त उपविभागीय कार्यालयात उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस पाटलांचा सत्कार
उदगीर (एल पी उगीले)
महसूल सप्ताह निमित्त उपविभागीय कार्यालय उदगीर येथे गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्ष भारती बसवराज रोडगे पोलीस पाटील देवर्जन यांचा माजी मंत्री तथा विद्यमान आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते उदगीर उपविभागात उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून प्रशस्तीपत्र, मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा दंडाधिकारी सुशांत शिंदे, उदगीर तालुक्याचे तहसीलदार राम बोरगावकर,जळकोट तालुक्याचे तहसीलदार राजेश लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी विविध पक्षांचे अनेक मान्यवर उपस्थित होते.
देवर्जन येथील पोलीस पाटील भारती बसवराज रोडगे यांची नियुक्ती 1998 ला तत्कालीन उपविभागीय अधिकारी आनंदरावजी दहिफळे यांनी नियुक्ती केली होती.
सत्काराला उत्तर देताना भारतीय रोडगे म्हणाल्या की, महाराष्ट्रातील उत्कृष्ट कार्य करणारी महिला पोलीस पाटील म्हणून माझा जो सन्मान केला जातो आहे, त्यामुळे यापुढे माझ्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. जनतेच्या आणि प्रशासनाच्या माझ्याकडून च्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीन. असे आश्वासनही दिले.
