महा-ई-सेवा केंद्र कडून जनतेची होणारी आर्थिक लूट थांबवा – मनसेची मागणी
उदगीर (प्रतिनिधी) शासन नियमानुसार सर्व सामान्य जनतेस शैक्षणिक व इतर कामासाठी लागणारे प्रमाणपत्र ही ऑनलाईन स्वरूपात झाली असून महा-ई-सेवा केंद्र सीएससी सेंटरच्या माध्यमातून अशी विविध प्रमाणपत्रे काढली जात आहेत. व त्यासाठी शासनाने या महा-ई सेवा केंद्रासाठी शुल्क ठरवून दिलेले आहे. शासनाने ठरवून दिलेल्या शुल्क अतिरिक्त शुल्क महा-ई-सेवा केंद्र व सीएससी केंद्राकडून आकारल्या जात आहेत. शासनाने मिळकत प्रमाण, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल पत्रासाठी 128 रुपये असे दर ठरवून दिलेले आहेत. व संबंधित सर्व प्रमाणपत्राचे दर पत्रक ऑनलाईन सेवा केंद्राकडून बंधनकारक केले असताना सुद्धा दर पत्रक न लावता, अशा सर्वच प्रमाणपत्रांना 300 ते 500 रुपये दर या ऑनलाइन सेवा केंद्रांनी अतिरिक्त जास्तीचे शुल्क वसूल केले जात आहे. तरी उदगीर तालुक्यातील सर्व ऑनलाईन सेवा केंद्रांना दर्शनीय जागेवर दर पत्रक लावणे बंधनकारक करून शासनाने दिलेल्या शुल्काव्यतिरिक्त जास्तीचे शुल्क आकारल्यास त्यांचे लायसन्स रद्द करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. जनतेची अशी होणारी लूट भविष्यात न थांबल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा या महा-ई-सेवा केंद्रावर स्टिंग ऑपरेशन करून अशा लुटारू ई सेवा केंद्रांना मनसे स्टाईलने धडा शिकवेल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिला आहे. महसूल प्रशासनाला तसे निवेदनही देण्यात आले सदरील निवेदन जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार उदगीर यांना देण्यात आले.यावेळी शहराध्यक्ष संतोष भोपळे, मनविसे शहर सचिव रोहित बोईनवाड, नामदेव राठोड, अभय यमलवाड, दिपक करक्याळे, ओम चिघळे,संदीप बोईनवाड, अविनाश ठाकुर, व्यंकटेश रणदिवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
