जडीबुटी दिन उत्साहात साजरा
उदगीर (प्रतिनिधी) : पतंजली योग परिवाराच्या वतीने आयुर्वेद शिरोमणी आचार्य बालकृष्णजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त दत्त मंदिर येणकी रोड उदगीर येथे जडीबुटी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. संग्राम पटवारी, प्रा.बसवलिंग गारठे , रमेश महाजन, नरेंद्र यंदे, डॉ रमेश पाटील, पो.उप नि. शिवाजी केंद्रे , माजी प्राचार्य मारोती जाधव , डाॅ.शिवकुमार पाटील, बस्वराज स्वामी, सुधाकर फड, राजकुमार एकलिंगे ,ज्येष्ठ नागरिक सुधाकर जी नळगिरकर , शिवकुमार शिरगिरे , उमाकांत अंबेसंगे , सूर्यकांत भुसागरे, सुभाष ऐनिले, प्रा. श्रीराम चामले, सुरेंद्र अक्कनगिरे, आदर्श शिक्षक नारायणराव भोसले, मुख्याध्यापक विरभद्र कप्पिकेरे, अंकुशराव हुंडेकर यांच्यासह योग साधक, योगशिक्षक व योग प्रेमी या ठिकाणी औषधी वृक्ष लागवड करण्यासाठी मोठ्या संख्येनेे उपस्थित होते. प्रास्ताविक नरेंद्र यंदे यांनी केले. तसेच प्रा गारठे व डॉ. संग्राम पटवारी यांनी पतंजली योग समितीच्या योगशिक्षक व योग साधक सर्वांनाच शुभेच्छा दिल्या. जेष्ठ मार्गदर्शक रमेश महाजन यांनी आभार प्रदर्शन केले. मोठ्या उत्साहात पतंजलीचे कार्य करावे, तसेच प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या वाढदिवसानिमित्त एक तरी वृक्ष लावावा आणि जगवावा. असे आवाहन ज्येष्ठ नागरिक व्यंकटराव चिट्टे यांनी केले. याप्रसंगी अनेक योगसाधक, योगशिक्षक उपस्थित होते.
