सामाजिक सलोखाराखत संत ज्ञानेश्वर माऊली प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थिनीनी दख्खन उर्दू प्रायमरी स्कूलच्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा.
उदगीर (प्रतिनिधी)
रक्षाबंधन साजरा करण्याचा उद्देश म्हणजे भारत हा विविधतेत नटलेला देश आहे. सर्वधर्मसमभाव व समाजातील विविध जाती धर्म हे गुण्यागोविंदाने या ठिकाणी राहतात,
तसेच मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना रक्षाबंधन म्हणजे काय? हे सांगून विद्यार्थिनींनी त्यांना राख्या बांधून त्या मुलांना तुम्ही आमचे भाऊ आहात, आणि आम्ही तुमच्या बहिणी आहोत, आणि हा आपला देश एक आहे.आपण सर्वजण एक आहोत
असा संदेश दिला.तसेच रक्षाबंधन सण का साजरा केला जातो याची पूर्ण माहिती यावेळी शाळेतील वरिष्ठ शिक्षिका मेटकर सुरेखा यांनी सांगितली. दख्खन उर्दू प्राथमिक शाळेतील प्रभारी मुख्याध्यापिका शेख अनिस फातिमा यांनी यावेळी उदगीर मधील हा पहिलाच सण आहे, जो की हिंदू मुस्लिम बांधव विद्यार्थी एकत्र येऊन करत आहेत. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप कौतुक केले.
यावेळी उपस्थित दख्खन उर्दू माध्यमिक चे मुख्याध्यापक शेख इब्राहीम खलीलसाब, चिंचणी इत्तेकार , मिर्झा जबीउल्हास , शेख जव्वाद , शेख नासिर इत्यादी मान्यवरउपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी संत ज्ञानेश्वर माऊली शाळेतील मुख्याध्यापिका जगताप अनिता,सहशिक्षक डी एस बिरादार, मेहत्रे माधव, सानिया वाडीवाले हे उपस्थित होते.यातून विद्यार्थ्यांना एकतेचा व समतेचा, बंधुभावाचा संदेश देण्यात आला. भारत हा देश सर्व धर्म समभावातून, विविधतेतून एकता असलेला देश आहे.सर्व मिळून गुण्यागोविंदाने राहून प्रत्येकाने मिळून मिसळून प्रेम ,स्नेह वाढवला पाहिजे. हा संदेश देण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.एस.बिरादार यांनी तर आभार प्रदर्शन सानिया वाडीवाले यांनी मानले.
