धनराज तौर पाटील यांचा उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्काराने गौरव
उदगीर (प्रतिनिधी) तालुक्यातील तीवटग्याळ गावचे आदर्श पोलीस पाटील धनराज तोर पाटील हे सतत समाज कार्यात सहभाग घेतात. तसेच प्रशासनाचे काम जवाबदारीने पार पाडतात. त्यांच्या कार्याची नोंद घेऊन धनराज तौर पाटील यांचा गौरव जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या सभागृहा मध्ये महसूल दीन व महसूल सप्ताहाची सांगता कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात तीवटग्याळ चे पोलीस पाटील यांना कायदा व सुव्यवस्था, नैसर्गिक आपती, मदत व पूनर्वसण व सार्वत्रिक निवडणुकीची कामे तसेच सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल जिल्हा अधिकारी कार्यालय लातूर तर्फे सण 2024 – 25 चा उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून लातूर जिल्हयाच्या जिल्हा अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घगे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले, त्या वेळी अप्पर जिल्हा अधिकारी शिल्पा करमलकर , निवासी उपजिल्हाअधिकारी केशवजी नेटके, उदगीरचे उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांच्यासह लातूर जिल्ह्यातील सर्वच उपविभागाचे उवविभागीय अधिकारी, तहसीलदार,नायब तहसीलदार व महसुलचे जिल्हाभरातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस पाटील संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भालचंद्र शेळके पाटील सह जिल्हाभरातील पोलीस पाटील उपस्थित होते.
