अहमदपूर येथे माजी ग्रामविकास राज्यमंत्री बसवराज पाटील यांचा सत्कार

0
अहमदपूर येथे माजी ग्रामविकास राज्यमंत्री बसवराज पाटील यांचा सत्कार

पोलीस फ्लॅश न्यूज अहमदपूर ( गोविंद काळे): महाराष्ट्र राज्याचे माजी ग्रामविकास राज्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टी (भाजपा) लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष, आदरणीय बसवराज पाटील यांचा ३ ऑगस्ट २०२५ रोजी अहमदपूर येथे भव्य नागरी सत्कार करण्यात आला. हा सोहळा अशोकदादा केंद्रे यांच्या मिलिट्री कॅम्प येथे पार पडला.
यावेळी अहमदपूर तालुक्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी, शक्ती प्रमुख, बूथ प्रमुख आणि भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भारत चामे, माजी जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबक गुट्टे, राजकुमार मजगे, अहमदपूर शहर अध्यक्ष अमित रेड्डी, शिरूर ताजबंद मंडळ अध्यक्ष प्रा. प्रताप पाटील यांची विशेष उपस्थिती होती.
मनोहर गायकवाड (जिल्हा उपाध्यक्ष, अनुसूचित जाती मोर्चा, लातूर), सरपंच अर्चना भारत कांबळे, बाळासाहेब होळकर (निमंत्रित सदस्य, महाराष्ट्र राज्य भाजपा), आणि जीवन गायकवाड यांनी बसवराज पाटील यांचा शाल व पुष्पहार घालून सत्कार केला. यावेळी आलमला येथील विश्वेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक सचिव बसवराज धाराशिवे हेही उपस्थित होते.
या सत्कार सोहळ्यात बसवराज पाटील यांच्या हस्ते अहमदपूर शहर, शिरूर मंडळ आणि किनगाव मंडळ यांच्या नवनियुक्त कार्यकारणी सदस्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अहमदपूर तालुका ग्रामीण मंडळ अध्यक्ष चंद्रप्रकाश हंगे यांनी केले. याप्रसंगी भारत चामे, त्र्यंबक गुट्टे, आणि प्रताप पाटील यांनी मनोगत व्यक्त करत बसवराज पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!