आदर्श पोलीस पाटील ज्योतीताई बिरादार यांचा सत्कार संपन्न

0
आदर्श पोलीस पाटील ज्योतीताई बिरादार यांचा सत्कार संपन्न

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर महसूल विभागातर्फे महसूल दिनानिमित्त तालुक्यातील शेल्हाळ गावच्या पोलीस पाटील तथा लातूर जिल्हा पोलीस पाटील संघ महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. ज्योतीताई भरतजी बिरादार पाटील यांची जिल्हा आदर्श पोलीस पाटील म्हणून निवड झाल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तहसील कार्यालय उदगीर येथे राज्याचे माजी मंत्री आ. संजयजी बनसोडे यांच्या हस्ते त्यांचा सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. यावेळी उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, व जळकोटचे तहसीलदार, महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच ज्येष्ठ पोलीस पाटील मिलिंद वाघमारे, अंकुश वाघे, गजानन धनशेट्टी, रामराव कांबळे, सौ. देवकत्ते, सौ. रोडगे, भरतजी बिरादार यांची उपस्थिती होती. सौ. ज्योतीताई बिरादार यांचा महसूल विभागाकडून जिल्हा आदर्श पोलीस पाटील म्हणून सत्कार झाल्या बद्दल उदगीर तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!