चंद्रकांत टेंगेटोल यांची धर्मवीर वाहतूक सेनेच्या लातूर जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती
लातूर (प्रतिनिधी)धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रेरित शिवसेना प्रणित धर्मवीर वाहतूक सेना लातूर जिल्ह्याच्या प्रमुखपदी शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीसाठी शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात, शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना सचिव व कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष किरणजी पावसकर यांच्या आदेशा नुसार ही निवड झाली.
धर्मवीर वाहतूक सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रामदासजी शेवाळे व शिवसेना संपर्कप्रमुख ऍड. श्रीनिवास क्षीरसागर यांच्या हस्ते चंद्रकांत टेंगेटोल यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.या प्रसंगी मुंबई वाहतूक सेनेचे पदाधिकारी अमोल काटकर व दीपक करांडे हे मान्यवर उपस्थित होते. चंद्रकांत टेंगेटोल यांची वाहतूक क्षेत्रातील कार्यकुशलता, संघटन कौशल्य आणि जनसंपर्क यामुळे त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे लातूर जिल्ह्यातील वाहतूक सेनेच्या कार्याला नवे बळ मिळेल, अशी प्रतिक्रिया शिवसेना कार्यकर्त्यांतून उमटत आहे. तसेच चंद्रकांत टेंगेटोल यांच्या मित्र परिवारातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
