श्री पांडुरंग विद्यालयाच्या तिरंगा रॅलीचे कल्लूर नगरीत जल्लोषात स्वागत

0
श्री पांडुरंग विद्यालयाच्या तिरंगा रॅलीचे कल्लूर नगरीत जल्लोषात स्वागत

उदगीर (प्रतिनिधी)
आजादी का अमृत महोत्सव, हर घर तिरंगा मोहिमे अंतर्गत श्री पांडुरंग विद्यालय कल्लूर, च्या वतीने तिरंगा रॅली विद्यालयातून कल्लूर गावाकडे घोषणा देत तिरंगा ध्वज व प्रबोधन फलक हातात घेऊन, कल्लूर गावात दाखल झाली. गावात पोहोचलेल्या रॅलीचे कल्लूर ग्रामस्थांनी स्वागत केले. अनेक पालक या रॅलीमध्ये सहभागी झाले. हातामध्ये पालकांनी ध्वज घेऊन प्रतिसाद दिला. रॅलीचे नियोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक नादरगे एस. व्ही. यांनी केले. सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह अनेक पालकांच्या सहभागाने रॅली उत्साहात पार पडली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!