उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनचा सत्कार

0
उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनचा सत्कार

उदगीर (प्रतिनिधी) उपविभागाचे उपजिल्हाधिकारी सुशांतजी शिंदे यांचा पोलीस पाटील संघटने तर्फे सत्कार करण्यात आला. उपविभागीय कार्यलय उदगीर येथे पोलीस पाटील संघटने तर्फे उदगीरचे उपजिल्हाधिकारी सुशांतजी शिंदे यांनी लातूर जिल्हाधिकारी कार्यालया तर्फे दि. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट असा महसूल सप्ताह साजरा करण्यात आला आणि त्या सप्ताहचा सांगता कार्यक्रम लातूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये घेण्यात आला. त्या कार्यक्रमाची जवाबदारी उदगीर उपविभागीय कार्याल्यावर सोपवली गेली होती, त्याचे नियोजन उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली उत्कृष्ट केले गेले होते, कार्यक्रम यशस्वी असा पार पडला. त्या मुळे उदगीर तालुका पोलीस पाटील संघटने तर्फे सुशांतजी शिंदे यांचा शॉल, बुके देऊन सत्कार करण्यात आला.
त्या वेळी उदगीरचे उपजिल्हाधिकारी यांनी आपल्या उपविभागातील पोलीस पाटील यांच्या रिक्त जागा थोड्याच दिवसात भरल्या जातील, असे उपस्थित पोलीस पाटील यांना सांगितले.
या वेळी पोलीस पाटील संघांचे जिल्हा अध्यक्ष भालचंद्र शेळके पाटील, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा ज्योती बिरादार, जिल्हा उपाध्यक्ष विश्वास नरले पाटील, उदगीर तालुका पोलीस पाटील संघांचे अध्यक्ष धनराज तौर पाटील, ज्येष्ठ पोलीस पाटील मिलिंद वाघमारे, तालुका संघटक एकनाथ कसबे, तालुका कोषध्यक्ष राजाराम राठोड, तालुका सहसचिव अंकुश चव्हाण, गजाजन धनशेट्टे, संजय मलूले उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!