आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त एड्स जनजागरण कार्यक्रम
उदगीर (प्रतिनिधी) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सामान्य रुग्णालय, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने एड्स जनजागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात समन्वयक महालिंगे शशिकांत यांनी विद्यार्थ्यांना एड्स विषयक सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास कार्यक्रमाधिकारी डॉ. बी. एस. होकरणे, डॉ. निळकंठ वगशेट्टी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
