नरसामाता आश्रमशाळेचे जिल्हास्तरीय वक्तृत्त्व व निबंध लेखन स्पर्धेत घवघवीत यश
उदगीर (प्रतिनिधी)
इतर मागास बहुजन कल्याण विभागा अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या आश्रम शाळेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षा निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम तालुकास्तरावर विजयी झालेल्या स्पर्धकांची जिल्हास्तरावर स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. प्राथमिक आश्रम शाळा नाईक नगर आवलकोंडा रोड उदगीर येथे उदगीर, देवणी व जळकोट या तीन तालुक्यातील स्पर्धकांची वक्तृत्व व निबंध स्पर्धा आयोजित केली होती. या तालूका स्तरीय स्पर्धेत नरसामाता माध्यमिक आश्रमशाळा नावंदीच्या विद्यार्थिनी निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. केंद्रे झानेश्वरी अंगद या विद्यार्थिनीने पटकावला, वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. साबळे पोर्णिमा गणेश व द्वितीय क्रमांक कु. बिरादार अश्विनी दिनेश या विद्यार्थिनींनी पटकावला. अशा तीन स्पर्धकांनी तालूका स्तरीय स्पर्धेत यश संपादन केले होते. त्या नंतर सानेगुरुजी माध्यमिक आश्रमशाळा काटगाव ता जि लातूर येथे जिल्हास्तीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत गुणानुक्रमे द्वितीय क्रमांक कु केंद्रे ज्ञानेश्वरी अंगद व .वक्तृत्व स्पर्धेत ही द्वितीय क्रमांक कु साबळे पौर्णिमा गणेश या दोन्ही विद्यार्थिनीने जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन करून नरसामाता माध्यमिक आश्रम शाळा नांवदीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्याचे काम केले आहे. तालुका स्तरीय स्पर्धेतील यश, जिल्हास्तरीय स्पर्धेत ही कायम टिकवले आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ,सचिव व शाळेचे मुख्याध्यापक संजीव पुल्ले व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
