अहमदपूरमध्ये उर्मिलाताई भगत यांच्या नेतृत्वाखाली महिलांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश

0
अहमदपूरमध्ये उर्मिलाताई भगत यांच्या नेतृत्वाखाली महिलांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश

​अहमदपूर ( गोविंद काळे ) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटात अहमदपूर येथील महिलांनी जाहीर प्रवेश केला आहे. जिल्हा प्रमुख उर्मिलाताई भगत यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील अनेक महिलांनी शिवसेनेत सामील होण्याचा निर्णय घेतला. यावेळी बोलताना उर्मिलाताई भगत यांनी महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही दिली.
​हा पक्षप्रवेश सोहळा उपसभापती निलम ताई गोऱ्हे, शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना उपनेते आनंद जाधव, लातूर जिल्हा संपर्कप्रमुख रंजनाताई कुलकर्णी, जिल्हाप्रमुख ब्रह्माजी केंद्रे, मागासवर्गीय जिल्हाप्रमुख जनार्दन भालेराव, उपजिल्हाप्रमुख रविकांत स्वामी, तालुकाप्रमुख गोपीनाथ जायभाये, शहरप्रमुख लक्ष्मण अलगुले, शहरप्रमुख जयश्री टोम्पे, माजी उपजिल्हाप्रमुख अरुणाताई लेंडाने, आणि सुजाता हाळीकर यांच्यावर विश्वास ठेऊन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
​यावेळी वेणूबाई शिरुरे, सुजाता तांबरे, अनुसया शिंदे, काशीबाई गुणाले, पंचफुला काटे, सुवर्णा होळकर, स्वाती नाईकवाडे, सरस्वती गोरे, सत्यभामा माळी, मनीषा आलापुरे, शांताबाई नलवाड, संगीता घाटोळ, नंदा गायकवाड, संगीता ठाकूर, सुषमा आगलावे, कालिंदा धर्माधिकारी, सविता आगलावे, अश्विनी खंदाडे, संगीता हारणे, शिल्पा चंदेवाड, अनुराधा चंदेवाड, रंजना नंदाने, वर्षा काडवदे, जोशना स्वामी, उमाबाई मद्रेवार, मनीषा गायकवाड, पूजा कांबळे, कविता बनसोडे, संगीता बनसोडे, लता कांबळे, पूजा डावरे, ज्योती कांबळे, अंजली देशमुख, स्वाती डावरे, आणि सोनाली भिकाणे या महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला.
​या प्रवेशानंतर बोलताना उर्मिलाताई भगत यांनी सांगितले की, देशात आणि राज्यात महायुतीचे सरकार सर्वसामान्य लोकांसाठी विविध योजना राबवत आहे. अहमदपूर-चाकूर मतदार संघातील गावांमध्ये विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, गावांच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी उपस्थित महिलांच्या वतीने उर्मिलाताई भगत यांचा सत्कार करण्यात आला

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!