अहमदपूर पोलिसांना राख्या बांधून शिवसेना महिला आघाडीकडून रक्षाबंधन साजरे

0
अहमदपूर पोलिसांना राख्या बांधून शिवसेना महिला आघाडीकडून रक्षाबंधन साजरे

​अहमदपूर ( गोविंद काळे ) सणासुदीच्या दिवसांतही कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस बांधवांसाठी शिवसेनेच्या (शिंदे गट) महिला आघाडीने रक्षाबंधन सण साजरा केला. शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा उर्मिला भगत यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी अहमदपूर पोलिस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक बी. डी. भुसनुर यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या.
​यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांनी समाजातील सर्व भगिनींचे रक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारत, बहिणींना संरक्षण देण्याची ग्वाही दिली. पोलिसांना सण साजरा करण्यासाठी घरी जाता येत नाही, ही बाब लक्षात घेऊन हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
​या प्रसंगी उर्मिला भगत यांच्यासोबत शहरप्रमुख जयश्री टोम्पे, जोशना स्वामी, वर्षा कडवदे, अरुणाताई लेंडाने, सुजाता होळकर, सत्यशीला कांबळे, सरोजा बिरादार, सुरेखा सूर्यवंशी, रुक्मीन घोगरे, महानंदा लिंबाळे, वैशाली गोरमुले, लक्ष्मीबाई सावळे, आणि लक्ष्मीबाई घटेलवाड यांच्यासह इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!