छत्रपती शिवाजीराजे कनिष्ठ महाविद्यालयात पालक मेळावा संपन्न

0
छत्रपती शिवाजीराजे कनिष्ठ महाविद्यालयात पालक मेळावा संपन्न

उदगीर (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजीराजे कनिष्ठ महाविद्यालय येथे 11 वी विज्ञान वर्गाचा पालक मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. पालक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर होते, तर प्रमुख उपस्थिती सचिव पी.टी.शिंदे, सहसचिव हिरागीर सिद्धगीर गिरी, कोषाध्यक्ष गुंडेराव पाटील, रामराव एकबे, पृथ्वीराज पाटील, संस्थेचे सर्व कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी, प्राचार्य डॉ. रामकिशन मांजरे, पर्यवेक्षक प्रा.आर.पी.गिरी यांची होती. डॉ.मांजरे म्हणाले की, नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे.त्यांनी महाविद्यालयाचा शैक्षणिक आलेख सर्वांसमोर ठेवला.महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या प्रत्येक अडीअडचणीमध्ये सहभागी होते,आपण मेहनत करून महाविद्यालयाचे नाव रोशन करावे, असेही ते म्हणाले.
यावेळी अध्यक्षीय समारोप अध्यक्षांच्या वतीने पृथ्वीराज पाटील यांनी केला. या प्रसंगी मार्गदर्शन करत असताना ते म्हणाले, बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य घेऊन आमची संस्था चालते. महाविद्यालयातील प्राध्यापक अतिशय मेहनती आहेत. त्यामुळेच आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.त्यांनी आपला नावलौकिक केलेला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पाटील अनंत, प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा.राम गिरी तर आभार प्रा.डी.टी. बिरादार यांनी मानले.कनिष्ठ, महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी -पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!